बोलबच्चन गँग गुन्हे शाखेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:06 AM2021-03-19T04:06:43+5:302021-03-19T04:06:43+5:30
कधी नगरसेवक तर कधी पोलीस असल्याची बतावणी, ज्येष्ठ नागरिक होते टार्गेटवर बोलबच्चन गँग गुन्हे शाखेच्या जाळ्यात ज्येष्ठ नागरिक होते ...
कधी नगरसेवक तर कधी पोलीस असल्याची बतावणी, ज्येष्ठ नागरिक होते टार्गेटवर
बोलबच्चन गँग गुन्हे शाखेच्या जाळ्यात
ज्येष्ठ नागरिक होते निशाण्यावर; कधी नगरसेवक तर कधी पोलीस असल्याची बतावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मी नगरसेवक आहे, ओळखलेत का? पुढे दागिन्यांची चोरी झाली आहे. दागिने काढू ठेवा’, असे सांगून दागिने लंपास करणाऱ्या बोलबच्चन गँगमधील दुकलीला मालमत्ता कक्षाने अटक केली. यात ज्येष्ठ नागरिकांना ते टार्गेट करत असल्याचे समाेर आले आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दादरमधील रहिवासी असलेले पंकज गोल्डा यांचे दोन लाख १६ हजार रुपयांचे दागिने दुकलीने पळविले होते. याप्रकरणी १२ मार्च रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात ही गँग मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली. तपासाअंती, यातील दोन आरोपी नवी मुंबईच्या खारघर भागात लपून असल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली. त्यानुसार, त्यांनी गुरुवारी या दुकलीला अटक केली. अटक दुकलीविरुद्ध मुंबईत भोईवाडा, सायन, गोवंडी, चेंबूर, माहीम, रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत.
ही टोळी सावज जाळ्यात येताच कधी नगरसेवक तर पोलीस असल्याची बतावणी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील दागिन्यांवर हात साफ करत होती. आरोपींकड़ून सव्वादोन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले.
* एकाला ७८ गुन्ह्यांंत अटक
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण परिसरात अशाच प्रकारे केलेल्या फसवणुकीप्रकरणी अटक दुकलीपैकी एकाला ७८ तर दुसऱ्याला १४ गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.
....................