आर्यन खान टार्गेट, सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:57 AM2022-10-19T05:57:00+5:302022-10-19T06:01:56+5:30

एनसीबीच्या दक्षता पथकाचा अहवाल, आठ अधिकाऱ्यांवर ठपका 

bollywood actor shah rukh khan son Aryan Khan target report says investigation conducted for lack of evidence ncb drug case | आर्यन खान टार्गेट, सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती

आर्यन खान टार्गेट, सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती

googlenewsNext

मुंबई : आर्यन खान प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) स्थापन केलेल्या दक्षता पथकाने त्यांचा अहवाल दिल्लीतील मुख्यालयात पाठवला असून, त्यात अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला लक्ष्य करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळली असून, त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू असल्याचेही समोर येत आहे. पुराव्याअभावी हा तपास करण्यात आला असून एनसीबीबाहेर बदली झालेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी मागण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

साक्षीदार प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे एनसीबीच्या तपासाबाबत गंभीर आरोप केले होते. त्याबाबत तपासणीसाठी  एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना केली होती. दक्षता पथकाने या प्रकरणाचा तपास योग्यप्रकारे झाला नसल्याचा, तसेच पुराव्याअभावी झाला असल्याचा ठपकाही अहवालात ठेवला आहे. या प्रकरणात ६५ जणांचे ४ वेळा जबाब नोंदवण्यात आले आहेत.

अडचणीत वाढ
संशयास्पद अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले, तसेच एनसीबीच्या बाहेर बदली झालेल्या अधिकाऱ्यांबाबत चौकशीच्या परवानगीसाठी वरिष्ठांची परवानगी मागण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात प्रकरणाला काय वळण लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या अहवालामुळे आर्यन खान प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महिलांचा वापर... 
ड्रग्ज तस्करांच्या प्रमुखांनी भारतीय मुलींशी विवाह केले असून त्यांची कुटुंब भारतात वास्तव्यास आहेत. विवाह केलेल्या भारतीय महिलांचा अमली पदार्थांची खेप आणि तस्करी करण्यासाठी ड्रग्ज साठवण्यासाठी आणि तस्करांना आश्रय देण्यासाठी वापर केला जात असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे.

तिच्यावर मुंबईची जबाबदारी ...
एनसीबीने अटक केलेले हे ड्रग्ज वाहक पहिल्यांदाच भारतात आले होते. मुख्य हँडलर आणि इथियोपियातील आठ ते दहा ड्रग्ज कॅरिअर्सच्या गटाची बैठक झाली.  या सिंडिकेटचे व्यवस्थापन नायजेरियन तस्कर करत होते. यात दिल्लीतून अटक केलेली महिला मुख्य तस्करापैकी एकाची पत्नी आहे. तिच्यावर मुंबईतून ड्रग्ज घेऊन दिल्लीत नेण्याची जबाबदारी दिली होती.

Web Title: bollywood actor shah rukh khan son Aryan Khan target report says investigation conducted for lack of evidence ncb drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.