काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बॉलीवूडवरुन मोठा दावा केला. 'बॉलीवूडमध्ये सर्वात मोठे योगदान मुस्लीम समाजाचे असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा दावा खासदार शरद पवार यांनी केला. यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही ट्विट करुन प्रतिक्रिया देत पवार यांच्यावर टीका केली आहे.
"देव त्यांचे भले करो असे उत्तर विवेक अग्निहोत्रीने दिले आहे. विवेकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आहे. “हा हा हा… लज्जास्पद, लज्जास्पद, लज्जास्पद". देव त्यांचे भले करो, असं ट्विट विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे, आणि या ट्विटला एएनआय या वृत्त संस्थेचे ट्विट टॅग केले आहे.
'बॉलीवुडमध्ये मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान, दुर्लक्ष करता येणार नाही'; शरद पवारांचा दावा
बॉलीवूडमध्ये सर्वात मोठे योगदान मुस्लीम समाजाचे असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, देशातील सर्वच क्षेत्रात अल्पसंख्याक आणि उर्दू भाषेचे योगदान आहे. एवढेच नाही, तर आज कला असो, लेखन असो किंवा कविता असो, सर्वात मोठे योगदान अल्पसंख्याकांचे आहे आणि ते उर्दू भाषेतून आले आहे. तसेच, बॉलीवूडला शीर्षस्थानी नेण्यात मुस्लीम अल्पसंख्याकांचे योगदान सर्वाधिक आहे, असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.
पवार पुढे म्हणाले, "आपल्यासमोर बॉलिवूड आहे. ज्यांनी याला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यात सर्वाधिक योगदान दिले ते मुस्लीम अल्पसंख्याक आहेत. आणि आपण त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही."
'मुस्लिमांना त्यांचा योग्य वाटा मिळाला नाही' -विदर्भ मुस्लीम बौद्धिक मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'भारतीय मुसलमानों के सामने मुद्दे' या कार्यक्रमात संबोधित करताना पवार म्हणाले, "मुस्लीम समाजाच्या सदस्यांना वाटते, की देशाचा एवढा मोठा हिस्सा असूनही त्यांना त्यांचा न्याय्य वाटा मिळत नाही. जे प्रत्यक्षात वास्तव आहे. यामुळे त्यांना त्यांचा योग्य वाटा कशा पद्धतीने मिळू शकेल, यावर विचार व्हायला हवा."