धन्यवाद ग्रॅहम बेल; 'स्मार्टफोनप्रेमीं'वर आशा भोसलेंचं मार्मिक भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:57 AM2019-01-14T10:57:27+5:302019-01-14T11:23:09+5:30
आशा भोसले यांनी ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करून स्मार्टफोनमध्ये दंग असणाऱ्या व्यक्तींवर मार्मिक भाष्य केलं आहे.
मुंबई - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातला बराचसा वेळ अनेकजण स्मार्टफोन आणि सोशल मीडियावरच घालवतात. त्यामुळे कुटुंबीय किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे अजिबातच वेळ नसतो. असाच काहीसा अनुभव सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देखील आला आहे. आशा भोसले यांनी ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करून स्मार्टफोनमध्ये दंग असणाऱ्या व्यक्तींवर मार्मिक भाष्य केलं आहे.
आशा भोसले यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या सोबत असलेली सर्व मंडळी स्मार्टफोनमध्ये गुंग असलेली दिसत आहेत. 'बागडोगरा ते कोलकातापर्यंत... मला खूपच चांगल्या लोकांची सोबत होती. पण बोलायला कुणीच नव्हतं. धन्यवाद अलेक्झांडर ग्रॅहम बेल' असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हा फोटो शेअर करताना आशा ताईंनी टेलिफोनच्या शोधाचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचे आभार मानत स्मार्टफोनप्रेमींना टोला लगावला आहे.
Bagdogra to Kolkata... Such good company but still, no one to talk to. Thank you Alexander Graham Bell pic.twitter.com/PCH92kO1Fs
— ashabhosle (@ashabhosle) January 13, 2019