भारतीय चित्रपटसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:50 AM2020-09-16T07:50:56+5:302020-09-16T10:02:57+5:30

सिनेसृष्टीचे गटार झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या झांजा असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेईमानी ठरली तरी चालेल.

Bollywood is not as pure as the holy Ganges, but ..., Shiv sena Support Jaya Bachchan | भारतीय चित्रपटसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण...

भारतीय चित्रपटसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण...

googlenewsNext
ठळक मुद्देभारतातील सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे, अशा दावा कुणीही करणार नाहीकाही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस गटारही म्हणता येणार नाहीस्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याचे तोंड हुंगायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे

मुंबई - ड्रग्स प्रकरणावरून संपूर्ण चित्रपटसृष्टीला आरोपीच्या पिंजऱ्या उभ्या करणाऱ्या काही कलाकारांवर खासदार जया बच्चन यांनी काल संसदेमधून टीकेची झोड उठवली होती. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जया बच्चन यांच्या विधानाला जोरदार पाठिंबा देण्यात आला आहे. भारताची सिनेसृष्टी ही पवित्र गंगेप्रमाणे नाही. मात्र काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस गटारही म्हणता येणार नाही. स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्यांचे तोंड हुंगायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.

सिनेसृष्टीचे गटार झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या झांजा असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेईमानी ठरली तरी चालेल. हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केलेला आहे. हॉलिवूडच्या बरोबरीने तुमच्या बॉलिवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी आहेत. तसे नीवर मोदी, माल्या आहेत. तसेच सिनेसृष्टीच्याबाबतीतही म्हणावे लागेल. सब घोडे बारा टके, असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा आपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणलीय. त्यातून आथा किती कलाकारांना कंठ फुटतो ते पाहू, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

भारतातील सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे, अशा दावा कुणीही करणार नाही. मात्र काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस गटारही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी तीच भावना बोलून दाखवली आहे. त्यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आणि परखड आहे. चित्रपटसृष्टीची बदनामी सुरू असताना भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प बसले आहेत. पडद्यावर शूर लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळवणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलुपबंद होऊन पडले आहेत, अशा परिस्थितीत जया बच्चन यांनी आवाज उठवला आहे.

चित्रपटसृष्टीमधील सर्वच्यासर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हे ड्रग्सच्या जाळ्यात अडकले आहेत. २४ तास गांजा, चिलीमीचे झुरके मारत दिवस ढकलत आहेत, असे सरसकट विधान करणाऱ्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी. कारण यापैकी अनेकांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीला एका परंपरा आणि इतिहास आहे. ज्या दादासाहेब फाळके यांनी या भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला, ते महाराष्टाचेच होते. राजा हरिश्चंद्र, मंदाकिनीसारख्या मुकपटाने सुरू झालेली हिंदी चित्रपटसृष्टी आजच्या शिखरापर्यंत अनेकांच्या कष्टामुळे पोहोचली आहे. त्यासाठी एकापेक्षा एक कलाकारांचे योगदान आहे. पडद्याचे बॉक्स ऑफिस खुळखुळत ठेवायला आमिर, शाहरुख, सलमान अशा खान मंडळींची मदत झालीच आहे. हे सर्व लोक फक्त गटारातच लोळत होते आणि ड्रग्स घेत होते, अशा दावा कोणी करत असेल तर अशी बकवास करणाऱ्यांच्या तोंडाचा वास आधी घ्यायला हवा. स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याचे तोंड हुंगायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे. त्या विकृतीवरच जया बच्चन यांनी हल्ला चढवला आहे.

अनेक कलाकार सामाजिक दायित्वही पार पाडत आले आहेत. युद्धकाळात सुनील दत्त आणि त्यांचे सहकारी सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोरंजन करत असत. मनोज कुमारने सदैव राष्ट्रीय भावनेनेच चित्रपट निर्मिती केली. राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटात सामाजिक दृष्टीकोन, समाजवाद याची ठिणगी दिसत होतीच. हे सर्व कलाकार नशेत धूत होऊन राष्ट्रीय कार्य करत आहेत अशा गुळण्या टाकणे म्हणजे देशाचा अवमानच आहे, असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

Web Title: Bollywood is not as pure as the holy Ganges, but ..., Shiv sena Support Jaya Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.