नवी मुंबई : ‘मीटू’ प्रकरणात झालेल्या आरोपांमुळे बॉलीवूड स्टार्सचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या अनिर्बान दास बल्ला यांनी गुरुवारी मध्यरात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. वाशी खाडीपुलावरून ते उडी मारण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.चार मॉडेल्सनी बॉलीवूड व्यवस्थापक अनिर्बान दास बल्ला (४०) यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे. बल्ला हे बॉलीवूडमधील नामांकित अभिनेत्यांचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱया ‘क्वॉन एंटरटेन्मेंट’ या कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आहेत.या प्रकरणामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने कंपनीची बदनामी होत आहे. यामुळे अनिर्बान दास बल्ला व त्यांच्या इतर भागीदारांमध्ये नुकताच वाद झाला आहे.
बॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 5:56 AM