मनोज गडनीस, मुंबई : चेन्नईतून मुंबईसाठी निघालेल्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याचे पत्र विमान हवेत असताना विमान कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर विमानाला प्राधान्याने मुंबईत उतरवण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासणीमध्ये बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे विमान कर्मचाऱ्यांनी, प्रवाशांनी व व्यवस्थापनाने सुटकेचा निश्वास टाकला.
उपलब्ध माहितीनुसार, चेन्नई येथून मंगळवारी सकाळी इंडिगो कंपनीच्या ६ई-५१८८ या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले. विमान मुंबईपासून ४० किलोमीटर अंतरावर असताना विमानाच्या शौचालयात कर्मचाऱ्यांना एक चिठ्ठी आढळून आली, ज्यामध्ये विमानात बॉम्ब असल्याचे लिहिले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने ही बाब वैमानिकांच्या लक्षात आणून दिली.