वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर उत्तर द्या; हायकोर्टाचे नवाब मलिक यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:03 AM2022-02-04T09:03:56+5:302022-02-04T09:04:22+5:30

वानखेडे कुटुंबीयांविरोधात बदनामीकारक वक्तव्य न करण्याची हमी उच्च न्यायालयाला देऊनही मलिक वारंवार त्या हमीतून सवलत का घेत आहेत? जर मंत्री अशाप्रकारे सवलत घेत असतील तर न्यायालय ती मागे घेईल, असा इशारा न्या. एस. जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने मलिक यांना दिला. 

Bombay HC seeks Nawab Malik’s reply to contempt plea by Sameer Wankhede’s father | वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर उत्तर द्या; हायकोर्टाचे नवाब मलिक यांना निर्देश

वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर उत्तर द्या; हायकोर्टाचे नवाब मलिक यांना निर्देश

Next

मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गुरुवारी दिले.

वानखेडे कुटुंबीयांविरोधात बदनामीकारक वक्तव्य न करण्याची हमी उच्च न्यायालयाला देऊनही मलिक वारंवार त्या हमीतून सवलत का घेत आहेत? जर मंत्री अशाप्रकारे सवलत घेत असतील तर न्यायालय ती मागे घेईल, असा इशारा न्या. एस. जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने मलिक यांना दिला. 

गेल्या महिन्यात ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. मागील सुनावणीत मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची हमी न्यायालयाला दिली होती. मात्र, सरकारी अधिकारी (समीर वानखेडे यांच्यासह) कर्तव्य बजावत असताना त्यांच्याबाबत वक्तव्ये करण्यापासून आपल्याला मनाई करू नये, अशीही विनंती मलिक यांनी केली होती. मलिक यांनी न्यायालयाला दिलेल्या हमीचा भंग करत २ व ३ जानेवारी रोजी आक्षेपार्ह विधाने केल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी अवमान याचिकेत म्हटले. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून व क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून विधाने केली आहेत, अशी माहिती वानखेडे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी दिली. 

मलिक यांनी केलेली विधाने न्यायालयाकडून मागितलेल्या सवलतीच्या मर्यादेतच येतात, हे मंत्र्यांना सांगायचे आहे, असे मलिक यांचे वकील रमेश दुबे यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देऊन याचिकेवरील पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी ठेवली.

Web Title: Bombay HC seeks Nawab Malik’s reply to contempt plea by Sameer Wankhede’s father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.