Join us

बेरोजगार पतीला पत्नी देणार पोटगी, दरमहा १० हजार रुपये देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:00 AM

Court News: नुकतंच पती-पत्नीमधील वादाचं असं प्रकरण समोर आलं ज्यामध्ये कोर्टाने पत्नीने पतीला दरमहा १० हजार रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे.

सर्वसाधारणपणे पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं तर कोर्टाकडून पत्नीला पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले जातात. मात्र नुकतंच पती-पत्नीमधील वादाचं असं प्रकरण समोर आलं ज्यामध्ये कोर्टाने पत्नीने पतीला दरमहा १० हजार रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे.

या महिलेचा पती बेरोजगार असून, आता कोर्टाच्या आदेशानुसार या महिलेस तिच्या पतीला दरमहा दहा हजार रुपये द्यावे लागणार आहेत. कोर्टाचा हा निर्णय कौटुंबिक वादाच्या प्रकरणात पतीला पत्नीस पोटगी देण्याचे आदेश देणाऱ्या पारंपरिक कायदेशीर कल्पनेस धक्का देणार आहे. 

या प्रकरणातील पत्नीने तिच्या बेरोजगार पतीला दरमहा १० हजार रुपयांची पोटगी द्यावे, असे आदेश कल्याणमधील न्यायालयाने १३ मार्च २०२० रोजी दिले होते. त्यानंतर या महिलेने कोर्टाच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवताना, पतीला पोटगी देण्याचे आदेश कायम ठेवले.  

टॅग्स :न्यायालयपरिवाररिलेशनशिपमुंबई हायकोर्ट