कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने मुंबई महापालिकेला झापलं

By मोरेश्वर येरम | Published: November 27, 2020 12:05 PM2020-11-27T12:05:21+5:302020-11-27T12:11:54+5:30

कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

Bombay High Court says BMC officials acted with malice in demolishing part of Kangana Ranaut office in mumbai | कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने मुंबई महापालिकेला झापलं

कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने मुंबई महापालिकेला झापलं

Next
ठळक मुद्देकंगनाच्या कार्यालयाच्या नुकसानाचे मुल्यांकन करुन भरपाई देण्याचे आदेशकंगनाच्या कार्यालवर केलेली कारवाई चुकीची असल्याचा हायकोर्टाचा निकालकंगनाच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांवर हायकोर्टाने दर्शवली असहमती

मुंबई
अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईवर हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केली असून ती नुकसान भरपाईस पात्र असल्याचं हायकोर्टानं पालिकेला झापलं आहे. 

कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यासोबत कंगनाची वास्तू नवीन नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आहे. महापालिकेने ७ आणि ९ सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

कंगनाने हायकोर्टात कार्यालयाचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. यावर हायकोर्टाने कार्यालयाच्या झालेल्या नुकसानाचे मुल्यांकन करण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२१ पर्यंत या निरीक्षकांना हायकोर्टाला अहवाल द्यावा लागणार आहे. 

कंगनालाही कोर्टाने दिला सल्ला
याचिकाकर्त्या कंगना राणौतने सोशल मीडियावर मत व्यक्त करताना काळजी घ्यायला हवा, असा सल्ला कोर्टाने दिला. तिने केलेल्या ट्विट किंवा वक्तव्यांवर कोर्ट सहमत नाही. पण एखाद्या व्यक्तीने कितीही अयोग्य मतं व्यक्त केली, तरी शासन पूर्वग्रह ठेवून अशा व्यक्तींवर कारवाई करू शकत नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. 

लोकशाहीचा विजय असल्याचं कंगनाचं ट्विट
मुंबई हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर अभिनेत्री कंगनाने ट्विट करत निर्णयाचं स्वागत केलं आहे. यासोबतच प्रशासनावर शरसंधान केलं आहे. ''जेव्हा तुम्ही वैयक्तिकरित्या सरकारविरोधात लढा देता आणि जिंकता. तेव्हा हा तुमचा वैयक्तिक विजय नसतो तो लोकशाहीचा विजय असतो'', असं म्हणताना कंगनाने आपल्या ट्विटमध्ये तिच्या पाठिशी उभं राहिलेल्यांचे आभार मानले आहेत. तर कारवाई केल्यानंतर आपल्यावर हसणाऱ्यांचेही आभार मानत असल्याचा खोचक टोला लगावला आहे. 

Read in English

Web Title: Bombay High Court says BMC officials acted with malice in demolishing part of Kangana Ranaut office in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.