आयआयटीची झाली चूक; व्यक्त केली दिलगिरी; कोटीचे पॅकेज ८५ नव्हे, तर २२ विद्यार्थ्यांना!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:51 AM2024-01-11T06:51:38+5:302024-01-11T06:52:14+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पवईच्या मुंबई इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या प्लेसमेंट सीझनमध्ये एक कोटीहून अधिक पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. आयआयटीने या आधी दिलेल्या माहितीनुसार तो ८५ होता. आपल्या चुकीबद्दल आयआयटीने दिलगिरी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत. गेल्या वर्षी १६ जणांना एक कोटीच्या ऑफर होत्या. त्यापैकी २ देशांतर्गत तर १४ परदेशी होत्या. यंदा हा आकडा अनुक्रमे ३ आणि १९ असा आहे. यंदा एकूण ६३ परदेशी कंपन्यांनी आयआयटीयन्सना नोकरी देऊ केली आहे. १ ते २० डिसेंबरच्या दरम्यान आयआयटीच्या प्लेसमेंट सीझनचा पहिला टप्पा पार पडला. यात ३८८ कंपन्यांनी १,३४० आयआयटीयन्सना नोकरी देऊ केली आहे. ही माहिती योग्य असल्याचे आयआयटीने खुलाशात म्हटले आहे. यंदा सर्वाधिक वेतनाचे पॅकेज (३६.९४ लाख) दिले गेले.