माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना कोर्टाचा दिलासा; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 03:49 PM2022-10-11T15:49:34+5:302022-10-11T15:54:46+5:30
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. कोर्टासमोर हजर राहण्यासाठी त्यांचा चार आठवड्यांच्या अवधीचा परवानगीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. कोर्टासमोर हजर राहण्यासाठी त्यांचा चार आठवड्यांच्या अवधीचा परवानगीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने जो ईसीआयआर नोंदवला आहे, यात त्यांच्या कुटुंबियांची नावे आहेत.
यात १७ व्या क्रमांकावर देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे नाव आहे. ते जबाब नोंदवण्यासाठी कधीही ईडी कार्यालयात हजर झालेले नाहीत. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्यांना दोनवेळा समन्स बजावण्यात आले होते, तिसऱ्या समन्सनंतर अटक वारंट निघण्याची शक्यता होती. सलील देशमुख यांच्या वकिलांनी कोर्टात मुदतीसाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान हा अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता देशमुख यांना ४ आठवड्यांचा अवधी मिळाला आहे.
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर, तुरूगांतून बाहेर येणार का?
मागील आठवड्यात अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना थोडा दिलासा मिळाला असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन दिला आहे. परंतु सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आताही तुरूंगात राहावं लागणार आहे.
नुकतेच सर्वोच्च न्यायालयानंअनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आठवड्याभरात सुनावणी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी आपल्या बाजू न्यायालयासमोर मांडल्या. अनिल देशमुख यांचं वय ७२ वर्षे आहे आणि त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा असं अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी न्यायालयामोर सांगितलं. दरम्यान, त्यांना आता १ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.