प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये ३ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आज या प्रकरणाची सुनावणी होती. २६ सप्टेंबर २०१८ रोजी एका पोर्टल संदर्भात बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. यावेळी मंत्रालयात आंदोलनावेळी तत्कालील संचालक प्रदीप जैन हे संचालक होते, यावेळी त्यांच्यासोबत बाचाबाची झाली. या संदर्भात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले होते. या संदर्भात बच्चू कडू यांनी स्वत: कोर्टात उपस्थित राहून रद्द करुन घेतले होते. या संदर्भात आज मुंबई सत्रन्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीला बच्चू कडू उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे कोर्टाने त्यांना नोटीस बजावली आहे.
आमदार बच्चू कडू यांनीही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत बंड केले होते. बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मंत्रिपद विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी अपक्ष आमदार रवि राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारेप सुरू होते. या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे बोलले जात आहे.