Join us  

मुंबई शेअर बाजार पोहोचला आठवडय़ाच्या नीचांकावर

By admin | Published: July 29, 2014 11:32 PM

नफेखोरीच्या दबावाने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुस:या दिवशी घट नोंदली. सेन्सेक्स 135.52 अंकांनी घसरून 25,991.23 अंकांवर बंद झाला.

मुंबई : नफेखोरीच्या दबावाने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुस:या दिवशी घट नोंदली. सेन्सेक्स 135.52 अंकांनी घसरून 25,991.23 अंकांवर बंद झाला. हा एका आठवडय़ाचा नीचांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही घसरण होऊन तो 7,748.7क् अंकांवर बंद 
झाला.
धातू, तेल आणि गॅस व बांधकाम क्षेत्रतील शेअरमध्ये अलीकडेच तेजीनंतर गुंतवणूकदारांच्या विक्रीत घट नोंदली. 
रविवारची सुटी आणि गुरुवारी डेरिव्हेटिव्हज् करारांचा मासिक निपटारा समाप्त होण्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व निफ्टीतही घट नोंदली गेली. किरकोळ गुंतवणूकदारांकडून मागणी घटल्याने छोटय़ा कंपन्या व मध्यम कंपन्यांच्या कमी व मध्यम कालावधीच्या शेअरमध्ये घट
झाली.
तीस कंपन्यांचा सेन्सेक्स मजबुतीने उघडला आणि सुरुवातीच्या व्यवहारात एकावेळी 26,181.83 अंकांर्पयत पोहोचला; मात्र नंतर नफेखोरीमुळे यात घसरण झाली आणि तो 135.52 अंक वा क्.52 टक्क्यांनी घटून 25,991.23 अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो 25,9क्क्.25 अंकांर्पयत गेला होता.
21 जुलैनंतर सेन्सेक्सची ही सर्वात खालची पातळी आहे. त्या दिवशी सेन्सेक्स 25,715.17 अंकांवर पोहोचला होता.
5क् शेअरच्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41.75 अंक वा क्.54 टक्क्यांच्या घसरणीसह एक आठवडय़ाच्या नीचांकी पातळीवर, 7,748.7क् अंकांवर बंद झाला. शुक्रवारी यात 4क्हून अधिक अंकांची घसरण झाली होती.
 उल्लेखनीय म्हणजे, 15 जुलै ते 25 जुलै या दरम्यान आठ सत्रंमध्ये सेन्सेक्स व निफ्टी 5 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह विक्रमी पातळीवर पोहोचला होता. (प्रतिनिधी)