मेट्रोच्या कामादरम्यान सापडले गावठी बॉम्ब; नमुने बॅलेस्टिक एक्स्पर्टकडे सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:46 AM2018-01-11T00:46:05+5:302018-01-11T00:46:14+5:30

मेट्रोच्या खोदकामादरम्यान बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलिसांसह बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या तपासणीत एका डब्ब्यामध्ये फटाक्यांची पावडर, खिळे आणि दगडी आढळून आले. प्राथमिक तपासात ते गावठी बॉम्ब असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Bombs found during Metro's work; Samples delivered to the Balletic Expert | मेट्रोच्या कामादरम्यान सापडले गावठी बॉम्ब; नमुने बॅलेस्टिक एक्स्पर्टकडे सुपुर्द

मेट्रोच्या कामादरम्यान सापडले गावठी बॉम्ब; नमुने बॅलेस्टिक एक्स्पर्टकडे सुपुर्द

Next

मुंबई : मेट्रोच्या खोदकामादरम्यान बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलिसांसह बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या तपासणीत एका डब्ब्यामध्ये फटाक्यांची पावडर, खिळे आणि दगडी आढळून आले. प्राथमिक तपासात ते गावठी बॉम्ब असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर दुसरीकडे ही ब्रिटीशकालीन स्फोटके आहेत का, या दिशेनेही तपास सुरू आहे. याचे नमुने बॅलेस्टिक एक्स्पर्टकडे पाठविण्यात आले आहे.
बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास बॉम्बे सेंट्रल येथील मराठा मंदिर परिसरा लगतच्या खोदकामादरम्यान जमिनीच्या दोन मीटर अंतरावर बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. पोलीस तेथे दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने तपासणीस सुरुवात केली. तेव्हा त्यात दोन गावठी बॉम्ब असल्याची माहिती समोर आली. एक बॉम्ब निकामी करण्यात आला. यामध्ये फटाक्यांची पावडर, खिळे आणि विशिष्ट स्वरुपाच्या दगडी आढळून आल्या. याचे नमुने बॅलेस्टिक एक्स्पर्टकडे पाठविण्यात आले. १५ ते २० वर्षांपूर्वी ते या ठिकाणी कोणीतरी दडवून ठेवल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. १५ वर्षांपूर्वी बावला कम्पाऊंड परिसरात राज्य राखीव पोलीस दलाकडून जेवणाच्या पार्टीसाठी जमिनीवर खोल खड्डा करत चूल पेटविण्यात आली. त्यावर मोठया कढईत अन्न शिजविण्यास सुरुवात केली. सेलिब्रेशन सुरू असताना अचानक याठिकाणी स्फोट झाला होता़

Web Title: Bombs found during Metro's work; Samples delivered to the Balletic Expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई