Join us

व्यसनमुक्तीशी बंधन; व्यसनापासून रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 4:31 PM

नशाबंदी मंडळाचा रक्षाबंधन निमित्ताने उपक्रम

 

मुंबई : रक्षाबंधनच्या निमित्ताने नशाबंदी मंडळच्या महिला व्यसनमुक्तीशी बंधन, व्यसनापासून रक्षण हा संदेश असलेल्या राख्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सोशल मिडीयाच्या  वतीने मेलवर  पाठवून व्यसनांना हवे लॉकडाऊनचे बंधन, तेव्हाच होईल महिलांचे रक्षण असे आवाहान करणार आहे. सोबतच महाराष्ट्र व्यसन मुक्त व्हावा यासाठी व्यसनमुक्त धोरण २०११ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणार आहे.नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी नेहमीच विविध कार्यक्रम घेऊन समाजातील व्यसनधीनता संपविण्यासाठी सक्रीय आहे. रक्षाबंधन निमित्ताने नशाबंदी मंडळाच्या महिला प्रतिनिधी राज्यातील सर्व महिला यांचे व्यसनापासून आणि त्यामुळे होणाऱ्या बलात्कार अत्याचारपासून रक्षण करावे. व्यसनांना कायमचा लॉकडाऊन लावावा ही अपेक्षा  करत आहे, असे मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व सचिव अमोल मडामे यांनी सांगितले. सोशल डिसस्टिंग पाळून नशाबंदी मंडळाच्या  वतीने राज्यातील, जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील  खासदार, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक,  जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांच्यासह व्यसनमुक्तीसाठी कार्यरत व्यक्ती व संस्था यांना राखी बांधणार आहे.

टॅग्स :रक्षाबंधनधनंजय मुंडेसरकारमहाराष्ट्र