कोविडमध्ये सेवा दिल्यास बाॅण्ड कालावधी कमी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:06 AM2021-03-31T04:06:52+5:302021-03-31T04:06:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई -महाराष्ट्राला भविष्यात मोठ्या संख्येने रुग्ण येणार असून भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने जर ...

Bond duration should be reduced if service is provided in Covid | कोविडमध्ये सेवा दिल्यास बाॅण्ड कालावधी कमी करावा

कोविडमध्ये सेवा दिल्यास बाॅण्ड कालावधी कमी करावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई -महाराष्ट्राला भविष्यात मोठ्या संख्येने रुग्ण येणार असून भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने जर डाॅक्टरांचा बाॅण्डची मुदत कमी करून त्यांना कोविडची ड्यूटी दिल्यास मोठ्या प्रमाणावर मेडिसिन अनास्थेथिया, युरोलाॅजिस्ट, वेस्ट फिजिशियन, कार्डिऑलाॅजिस्ट मिळू शकतील. सुपर स्पेशालिटी करणारे किंवा पोस्ट-ग्रॅज्युएशन दुसऱ्या-तिसऱ्या वर्षात काम करणारे डाॅक्टर्स मिळू शकतात.

ॲनास्थेटिस्ट, चेस्ट फिजिशियन, कार्डिऑलाॅजिस्ट, अँनास्थेटिस्ट, चेस्ट फिजिशियन, कार्डिऑलाॅजिस्ट मृत्यूचा दर रोखू शकतील. याचा अवलंब केला तर मोठ्या संख्येने डाॅक्टरांची कमतरता दूर होऊ शकेल, अशी विनंती राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

डॉ. दीपक सावंत यांनी नुकतीच सेव्हन हिल्स हॉस्पिटलला भेट दिली. येथे पेशंट वाढत असल्याने बेडसंख्या वाढविणे आवश्यक असून एकूण प्रत्येकी ३० टक्क्यांइतक्या बेडस्ची आवश्यकता आहे. तसेच डाॅक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ वाढविणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. येथील अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ व आयसीयूचे प्रमुख डाॅ. महारुद्र यांच्याशी चर्चेतून समजले. हे दोघे आपल्या परीने उत्तम काम करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

येथे ऑक्सिजनचा साठाही उत्तम असून इतरही कोविड सेंटर्स ही सक्षम बनवणे पुढच्या आव्हानासाठी गरजेचे आहे. आजपर्यंत १८१८ मृत्यू झाले आहेत, त्यांपैकी सहव्याधी असलेले मृत्यू हे श्वसनक्रियेत अडथळे आल्याने जास्त झाले आहेत तर मात्र ५ टक्के मृत्यू हे तरुणांचे असून हृदयक्रिया बंद पडल्यामुळे झाले आहेत ही चिंतेची बाब आहे, असे मत डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले.

Web Title: Bond duration should be reduced if service is provided in Covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.