बेस्ट कर्मचा-यांच्या बोनसची रक्कम पगारातून कापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:45 AM2018-01-11T02:45:09+5:302018-01-11T02:45:14+5:30

बेस्ट कर्मचा-यांच्या बोनसची रक्कम पगारातून कापून घेण्यात येईल, अशी चिन्हे आहेत. दिवाळी सणानिमित्त बेस्ट कर्मचाºयांंना देण्यात आलेले साडेपाच हजार रुपए सानुग्रह अनुदान पगारातून वसूल करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. ही रक्कम पगारातून वसूल करण्यात येणार नाही, असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी जाहीर केले होते.

The bonus for the best employees is to be paid through salary | बेस्ट कर्मचा-यांच्या बोनसची रक्कम पगारातून कापणार

बेस्ट कर्मचा-यांच्या बोनसची रक्कम पगारातून कापणार

Next

मुंबई : बेस्ट कर्मचा-यांच्या बोनसची रक्कम पगारातून कापून घेण्यात येईल, अशी चिन्हे आहेत. दिवाळी सणानिमित्त बेस्ट कर्मचाºयांंना देण्यात आलेले साडेपाच हजार रुपए सानुग्रह अनुदान पगारातून वसूल करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. ही रक्कम पगारातून वसूल करण्यात येणार नाही, असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी जाहीर केले होते. मात्र, ही रक्कम वसूल करण्याच्या निर्णयावर बेस्ट प्रशासन ठाम असल्याने, फेब्रुवारी महिन्याच्या पगारापासून ही रक्कम कापून घेण्याची शक्यता आहे.
कामगारांच्या संपानंतर बेस्ट उपक्रमाने साडेपाच हजार रुपए सानुग्रह अनुदान दिले. ही रक्कम समान ११ हप्त्यांमध्ये पगारातून कापून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जानेवारी महिन्यापासून ही रक्कम कापली जाणार होती. मात्र ती कापू नये, अशी विनंती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी आयुक्त अजय मेहता यांना केली होती. ती मान्य झाल्याचे जाहीरही करण्यात आले. मात्र, साडेपाच हजार रुपये वसूल करण्याचा निर्णय केवळ एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, असे प्रशासनाने आज स्पष्ट केले. त्यामुळे कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचे समोर आले आहे.

Web Title: The bonus for the best employees is to be paid through salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट