Join us

पुस्तकांचे गाव शिकवणार पुस्तक संवर्धनाची कला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 6:12 AM

विविध विषयांवर मार्गदर्शन; पुस्तकाला आजारपण आल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण

- स्नेहा मोरे मुंबई : बऱ्याच जणांना जाऊ तिथे पुस्तक खरेदी करण्याची आवड असते, त्यात घर असो वा वाचनालय या ठिकाणी अनेक पुस्तकांचे गठ्ठे पाहायला मिळतात. पण या पुस्तकांची जोपासणा करायची कशी? पुस्तकेही आजारी पडतात, त्यांना औषधपाणी करायचे कसे? याचे उत्तर आता लवकरच सापडणार आहे. पुस्तकांचे गाव असणाºया भिलारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त ४ मे रोजी पुस्तक संवर्धन व जतन कसे करावे याविषयी प्रात्याक्षिकांसह शिकण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने ४ मे रोजी भिलार येथे पुस्तक संवर्धन शिकवणारी ‘पुस्तक जाणून घेऊ या’ ही कार्यशाळा आयोजित केली आहे. यात ग्रंथसखा आणि भाषा संवर्धक श्याम जोशी आपल्या सहकाऱ्यांसह ही कार्यशाळा घेणार आहेत. कार्यशाळेत पुस्तकाचे बाह्यरूप, मुद्रितशोधन, पुस्तक संवर्धन प्रक्रियेतील बारकावे, दुर्मीळ पुस्तके मिळविण्याची पद्धत असे अनेक विषय उलगडणार आहेत.त्यात मुख्यत: पुस्तक संवर्धनाच्या प्रक्रियेत पुस्तक बांधणी करताना येणाºया समस्या त्यावरचे उपाय, बुरशी-वाळवी, आर्द्रता, कसर व ओलावा निर्माण झाल्यास करण्यात येणारे घरगुती उपचार प्रात्यक्षिकांसह शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे, पुस्तक वा ग्रंथांच्या कागदांची साफसफाई, पुस्तकांच्या घड्या काढणे, फाटलेली व जीर्ण झालेली हस्तलिखितांची दुरुस्ती, कागदपत्रे संगणकीकरण करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भिलार प्रकल्पाचे समन्वयक विनय माळवणकर यांनी सांगितले की, पहिल्यांदाच अशा स्वरूपाची कार्यशाळा आयोजित होत आहे. ही सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य आहे. केवळ यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.भिलारनंतर राज्यभरात प्रशिक्षणभिलारच्या कार्यक्रमानंतर वर्षभर राज्याच्या विविध कानाकोपºयांत पुस्तक जाणून घेण्याविषयीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. लहान वयातच मुलांना पुस्तक जपण्याचे संस्कार व्हावेत या उद्देशाने पुन्हा त्यांची पुस्तकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.- श्याम जोशी, ग्रंथसखापुस्तकालाही कणा असतो याचे महत्त्व करणार विशदपुस्तकाला आजारपण आले की काय करावे याबद्दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पूर्वी पुस्तक जपण्यासाठी लाकडाच्या फळ्या असायच्या. आता काळानुरुप यात बदल झाले आहेत. त्यामुळे जतन-संवर्धन कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पुस्तकाला ‘कणा’ असतो त्याचे महत्त्व विशद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेची भाषा वाचणे हेही शिकविले जाणार आहे, असे ग्रंथसखा श्याम जोशी यांनी सांगितले.