ग्रंथ दिंडीने मराठीचा जागर

By admin | Published: February 28, 2015 01:45 AM2015-02-28T01:45:21+5:302015-02-28T01:45:21+5:30

मराठी भाषा दिनानिमित्त शुक्रवारी शहरात ढोल, ताशे, लेझीम पथक आणि टाळ - मृदुंगाच्या गजरात दिंडी सोहळा पार पडला

The book Jindar of Marathi is Jagar | ग्रंथ दिंडीने मराठीचा जागर

ग्रंथ दिंडीने मराठीचा जागर

Next

नवी मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त शुक्रवारी शहरात ढोल, ताशे, लेझीम पथक आणि टाळ - मृदुंगाच्या गजरात दिंडी सोहळा पार पडला. तर मराठी भाषेची माहिती देणारी व्याख्यानांचे ठिकठिकाणी आयोजन केले होते.
मराठी, साहित्य आणि संस्कृती कला मंडळाच्या वतीने दिंडी काढण्यात आली. वाशी सेक्टर ६ मंडळाच्या प्रांगणातून दिंडी सोहळ्याला सुरूवात झाली. पुढे सेक्टर ६,७, आणि ८ मार्गे शिवाजी चौकामध्ये दिंडीचा समारोप झाला. यावेळी मॉर्डन विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी लेझिम खेळाचे विविध प्रकार सादर केले. पालखीमध्ये ज्ञानेश्वर ग्रंथची स्थापना करून पुजा करण्यात आली. यावेळी मराठीसाहित्य,संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, सदस्य, माणिकराव किर्तने ग्रंथालयाचे सभासद, टाऊन लायब्ररीचे सभासद, नुतन महिला मंडळाच्या सदस्या आणि मॉर्डन विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.मराठी साहित्य, संस्कृती मंडळाच्या वतीने प्रा. यशवंत पाठक यांचे मराठी असे आमुची मायबोली या विषयावर व्याख्यान झाले.(प्रतिनिधी)

Web Title: The book Jindar of Marathi is Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.