‘स्वाती स्नॅक्स’च्या संचालिका आशा झवेरी यांची यशाेगाथा पुस्तकरूपाने शब्दबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:54 AM2022-03-20T08:54:43+5:302022-03-20T08:55:16+5:30

आता ‘स्वाती स्नॅक’च्या संचालिका आशा झवेरी यांची यशाेगाथा ‘अ कलिनरी जर्नी ऑफ हाेप अँड जाॅय’ या पुस्तकरूपाने जगासमाेर येणार आहे.

book with success story of Asha Zaveri director of 'Swati Snacks published | ‘स्वाती स्नॅक्स’च्या संचालिका आशा झवेरी यांची यशाेगाथा पुस्तकरूपाने शब्दबद्ध

‘स्वाती स्नॅक्स’च्या संचालिका आशा झवेरी यांची यशाेगाथा पुस्तकरूपाने शब्दबद्ध

googlenewsNext

- मेहा शर्मा

आईच्या हातचे बनविलेले जेवण हे जगातील सर्वांत चविष्ट अन्न आहे. प्रत्येक घरात आईच्या हाताला असलेल्या चवीची चर्चा हाेते. या चर्चेत आईने स्वत:चे रेस्टाॅरंट किंवा एखाद्या आवडीच्या पदार्थाचा स्टाॅल सुरू करण्यावरही चर्चा रंगतात. मात्र, त्या केवळ तेवढ्यापुरत्याच मर्यादित राहतात. अशाच चर्चेतून सुरू झालेले ‘स्वाती स्नॅक्स’ हे रेस्टाॅरंट महिलांसाठी प्रेरणा बनले आहे. आता ‘स्वाती स्नॅक’च्या संचालिका आशा झवेरी यांची यशाेगाथा ‘अ कलिनरी जर्नी ऑफ हाेप अँड जाॅय’ या पुस्तकरूपाने जगासमाेर येणार आहे.

जेवणाच्या टेबलवर आईच्या पाककलेतील निपुणतेच्या चर्चेपासून स्वाती स्नॅक्सचा प्रवास काही दशकांपूर्वी सुरू झाला. या प्रवासाचे आशा झवेरी यांनी पुस्तकातून अतिशय सुंदर वर्णन केले आहे. शाळेतील निरुत्साही विद्यार्थिनी, खाेडकर माेठ्या बहिणीपासून एक समर्पित पत्नी आणि पाककलेची महाराणी, असा हा थक्क करणार प्रवास आहे. 

‘स्वाती स्नॅक्स’च्या संस्थापिका असलेल्या त्यांच्या आईच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्यांच्यासमाेर माेठे आव्हान उभे राहिले हाेते. या क्षेत्रातील त्यांना काहीही माहिती नव्हते. पूर्णपणे अपरिचित असलेल्या विश्वात त्यांनी हळूहळू पाय राेवले, आव्हानाला ताेंड द्यायला शिकल्या. आशा झवेरी यांचा साधेपणा आणि चाणाक्ष व्यावसायिक काैशल्याचा मिलाफ ‘स्वाती स्नॅक’मधून दिसून येताे.

‘अ कलिनरी जर्नी ऑफ हाेप अँड जाॅय’ या पुस्तकातून देशातल्या अनेक महिलांना त्यांचा छंद जाेपासून उद्याेजिका बनण्यासाठी आशेचा किरण मिळताे. 
महिलांचे पाककलेचे काैशल्य केवळ स्वयंपाक घरापर्यंतच मर्यादित न राहता लाखाे लाेकांपर्यंत पाेहाेचायला हवे, असा संदेश पुस्तकातून मिळताे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लाेकप्रिय व्यंजन पांकीचे छायाचित्र आहे. आशा यांनी त्यांच्या काही प्रसिद्ध व्यंजनांची पाककृतीदेखील पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. (वा.प्र)

आमच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या आठवड्यातून किमान एकदा तरी ‘स्वाती’मध्ये जेवण केल्याशिवाय राहत नाही. आशाबेन, तुम्ही मुंबईला ‘स्वाती स्नॅक्स’च्या रूपाने एक माेठी भेट दिली आहे. भारतीयांच्या अनेक पिढ्यांच्या जिभेवर स्वाती स्नॅक्सच्या चवीची भेट कायम राहावी, ही शुभेच्छा. तुमच्या पुस्तकासाठी अभिनंदन आणि आमच्या आयुष्यात ‘स्वाती स्नॅक्स’ दिल्याबद्दल आभार.
-मुकेश अंबानी, अध्यक्ष व एमडी, रिलायन्स इंडस्ट्रीज.

Web Title: book with success story of Asha Zaveri director of 'Swati Snacks published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.