नव्या लूकसाठी ब्युटीपार्लरमध्ये बुकिंग सुरू

By admin | Published: October 10, 2015 12:39 AM2015-10-10T00:39:33+5:302015-10-10T00:39:33+5:30

नवरात्रीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना दांडियाच्या तालावर नाचताना प्रत्येकाची नजर आपल्यावर खिळून राहावी, यासाठी तरुणींचा बराच खटाटोप सुरू असतो. या नऊ दिवसांमध्ये

Booking in Beauty Parlor for the new look | नव्या लूकसाठी ब्युटीपार्लरमध्ये बुकिंग सुरू

नव्या लूकसाठी ब्युटीपार्लरमध्ये बुकिंग सुरू

Next

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई
नवरात्रीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना दांडियाच्या तालावर नाचताना प्रत्येकाची नजर आपल्यावर खिळून राहावी, यासाठी तरुणींचा बराच खटाटोप सुरू असतो. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येकीलाच आपला चेहरामोहरा बदलून नवा ग्लॅमरस लूक हवा असतो. त्यासाठी महिलावर्गाने गेल्या आठवडाभरापासून शहरातील ब्युटीपार्लर्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
प्रत्येक दिवशी एक हटके लूक मिळावा यासाठी ब्युटीपार्लर्सनेही १०ते१५ दिवसांचे पॅकेज सुरु केले आहेत. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, काळे डाग, पिगमेंटेशन झटपट घालविण्यासाठी कॉस्मेटिक स्कीन ट्रीटमेंटचा पर्याय निवडला जातो. १० ते १५ मिनिटांमध्ये होणाऱ्या बोटोक्स-थर्मल फिलिंगसारख्या ट्रीटमेंटना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
सणासुदीच्या दिवसांमध्ये कमी किमतीमध्ये व अगदी काही तासांत सुंदर आकर्षक त्वचा देणारे विशेष पॅकेज जाहीर केले जाते. ५ हजारांपासून सुरु होणारे हे पॅकेज ३० ते ३५ हजारांपर्यंत उपलब्ध असून अशा पॅकेजला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामध्ये नव्याने आलेल्या फेस्टिव्हल फेशियल, गोल्ड, डायमंड, पर्ल आणि फ्रुट फेशियलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. फेस्टिव्हल सिझनमुळे फेशियलच्या दरांमध्ये १०० ते २०० रुपयांची वाढ झाल्याचे पहायला मिळते.
मेनिक्युअर, पेडिक्युअर या ट्रीटमेंटसाठी १००० ते ६००० रुपये दर आकारले जात आहे. ट्रीटमेंट विशेष सवलतीच्या दरात करून मिळत असली तरी जेथून ती घेत आहोत ते ठिकाण योग्य आहे की नाही याची खात्री अनेकदा करून घेतली जात नाही.
ट्रीटमेंट योग्य दिली गेली नसेल तर काही वेळेस त्वचेवर कायमस्वरूपी काळे-पांढरे डाग येणे, कोड येणे, पुरळ उठणे अशा विकारांना सामोरे जावे लागते. सुमार दर्जाच्या क्लिनिकमध्ये वापरण्यात येणारे साहित्यही निर्जंतुक केले जात नाही. त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते असे तज्ज्ञांचे मत आहे.

अशी घ्या काळजी
- भरपूर पाणी प्या, खूप ताणतणाव टाळा, आनंदी राहा
- आहारात ताजी फळे, पालेभाज्यांचा समावेश करा
- सणांमध्ये पक्वान्नांबरोबरच तंतुयुक्त पदार्थ खा
- नियमित व्यायाम करा, प्रथिनयुक्त आहार घ्या
- क्लिंजिंग, टोनिंग, मॉईश्चरायझरचा नियमित वापर करा


त्वचा तजेलदार राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहाराची गरज असते. सुरकुत्या कमी करणे, डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करणे अशा उपचारांकरिता दोन महिने आधी ट्रीटमेंट सुरू करावी लागते.
-  रविना शर्मा, ब्युटीशियन

Web Title: Booking in Beauty Parlor for the new look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.