पुस्तके आता घरबसल्या

By admin | Published: June 25, 2014 12:11 AM2014-06-25T00:11:04+5:302014-06-25T00:11:04+5:30

मराठी ग्रंथसंग्रहालयाने एका व्हॅनद्वारे पुस्तकेच घरोघरी नेण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

The books are now home | पुस्तके आता घरबसल्या

पुस्तके आता घरबसल्या

Next
>ठाणो : धावपळीच्या काळात ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचणो प्रत्येकाला शक्य होत नसल्याने आणि वारंवार पुस्तक बदलणो शक्य नसल्याने आता ठाणो मराठी ग्रंथसंग्रहालयाने एका व्हॅनद्वारे पुस्तकेच घरोघरी नेण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, 26 जून रोजी ही योजना कार्यान्वित होणार आहे. 
वाचकवृद्घीसाठी फिरत्या गाडीचा अभिनव प्रयोग राबवणारे ठाणो ग्रंथसंग्रहालय ही महाराष्ट्रातील पहिली संस्था ठरणार आहे.
गेल्या काही वर्षात ठाणो शहर कमालीचे विस्तारले आहे. 12 किलोमीटरच्या परिघात 13क् प्रभागांमधून 2क् लाख ठाणोकर राहतात. त्यामुळे घरातून नियमितपणो गं्रथालयात पुस्तक बदलण्यासाठी येणो वाचकांना अशक्य होऊ लागले आहे. रिक्षांचा अभाव, वाहतुकीचे वाढते दर यामुळेही ग्रंथालयात वाचक येईनासे झाले होते. त्यामुळे ग्रंथालयाची वाचक संख्या रोडावली होती. त्यामुळे बदलत्या काळात वाचन संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथालयाने हा निर्णय घेतला आहे. ठाणो मराठी ग्रंथसंग्रहालय 2क्क्6पासून ही योजना राबविण्याचा प्रय} करीत होती. मात्र पुरेशा निधीअभावी त्याला मूर्त रूप आले नव्हते. मात्र 2क्1क्मध्ये साहित्य संमेलनाच्या आयोजनातून संस्थेकडे मोठा निधी उपलब्ध झाल्याने हा उपक्रम राबविता आल्याचे गं्रथालयाच्या पदाधिका:यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अध्यक्ष माधव गोखले, कार्याध्यक्ष राजेंद्र वैती, कार्यवाह विद्याधर वालावलकर, दा.कृ. सोमण यांनी या उपक्रमाची माहिती दिली. 
या फिरत्या ग्रंथयानात विविध कपाटांमधून चार हजार पुस्तके, वातानुकूलित यंत्रणा, पंखे आणि तीन-चार वाचकांना बसण्याची सोय आहे. या ग्रंथयानासाठी सुमारे 25 लाखांचा खर्च आला आहे. गाडीमध्ये चालक-वाहकांसह एक उपग्रंथपाल असणार असून, त्यांच्याकडे ग्रंथालयातील पुस्तकांची परिपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. सुरुवातीला शहरातील 25 ठिकाणी ही गाडी थांबणार आहे.  घोडबंदर रोड, पोखरण नं. 1, 2, उपवन, कोलबाड, एलबीएस मार्ग, कळवा, खारेगाव, मुंब्रा आदी ठिकाणी ही गाडी फिरणार आहे. गुरुवार, 26 जून रोजी दुपारी 12 वाजता ठाणो महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून, महापौर हरिश्चंद्र पाटील आणि आमदार एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.  (प्रतिनिधी)
 
च्सुरुवातीला शहरातील 25 ठिकाणी ही गाडी थांबणार आहे.   आठवडय़ातील सातही दिवस ही गाडी फिरणार असून, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ दोन ते तीन तास ही गाडी एका ठिकाणी राहणार आहे.

Web Title: The books are now home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.