Join us  

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

By admin | Published: May 26, 2014 4:47 AM

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या तालुक्यातील सर्वच शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

विक्रमगड : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या तालुक्यातील सर्वच शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २३७ शाळा, १० अनुदानित व शासकीय आश्रम व १४ हायस्कूल असून या सर्व शाळांतील १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. तिसरी व चौथीची पुस्तके बदलली असल्याने या वर्गाची पुस्तके येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. पहिलीसाठी ३२८३, दुसरीसाठी ३१८८, तीसरी- ३४६२, चौथी - २३२६, पाचवी -३८९८, सहावी -३९७२, सातवी - ३४५८, आठवी - २३२६ या सर्व इयत्तेतील सर्व विषयाच्या पुस्तकांची मागणी केली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत. सुट्टीनंतर विद्याथर््यांना आता शाळेचे वेध लागले असून १६ जून रोजी शाळा उघडण्यात येणार असून त्याअगोदर प्रत्येक शाळेत ही पुस्तके पाठविण्यात येणार आहेत. तालुक्यात साधारण प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक मिळेल, अशी मागणी केल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाचे प्रमुख आर. भारती यांनी दिली. (वार्ताहर)