गाडीची टाकी फुल करुन घ्या, उद्यापासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद
By admin | Published: November 3, 2016 02:30 PM2016-11-03T14:30:05+5:302016-11-03T14:30:05+5:30
देशातल्या ऑईल कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत पेट्रोलपंप चालकांकडून उद्या आणि परवा पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्यात येणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - गाडीची टाकी संपत आली असेल तर लगेच भरुन घ्या, कारण उद्या आणि परवा देशभरातील पेट्रोलपंप चालकांकडून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्यात येणार आहे. देशातल्या ऑईल कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन पेट्रोल डिलर्स कॉन्फेडरेशनच्या आदेशानुसार हे राष्ट्रव्यापी आंदोलन करत येणार आहे.
19 ऑक्टोबरपासूनच आंदोलनाला सुरूवात झाली होती. मात्र, ऑईल कंपन्यांबरोबरच सरकारनंही दुर्लक्ष केल्यानं पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. या आंदोलनामुळे येत्या दोन दिवसांत पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.