Join us

एसटी कामगारांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:18 PM

आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथी गोळ्यांचा डोस द्यावा

 

  • एसटी कामगार संघटनेची मागणी 

 

मुंबई : लॉकडाऊन काळात एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीची सेवा देत आहेत. या वाहतुकीमध्ये प्रत्यक्ष कोरोनाच्या रुग्णांना हाताळणा-या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रवासादरम्यान एसटीच्या चालक, वाहकांशी संपर्क येतो. त्यामुळे एसटी कामगारांना कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे. कोरोनाचे बाधित रुग्ण रोग प्रतिकार शक्तीच्या जोरावर बरे होऊन घरी परत येत आहे. याचआधारावर देशाच्या जनतेची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष्य मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले असुन आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी गोळ्यांचा डोस देण्याची शिफारस केली असून, ही सुविधा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ही मिळण्याची अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने एसटी महामंडळाकडे केली आहे.

मुंबई, पालघर, ठाणे येथे एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. यासह राज्यातील मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी व जिल्हाअंतर्गत वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे एसटी कामगारांना कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पाळीमध्ये कर्मचा-यांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील, अशा प्रकारे नियोजन, दमा, मधुमेह, फुप्फुसेचा आजार, अस्थत्मा, क्षयरोग व पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुले असलेले कर्मचारी, दिव्यांग एसटी कर्मचा-यांना कामावर बोलविण्यात येऊ नसल्याचे राज्य सरकारने सूचना केल्या आहे. त्यामुळेच 55 वर्षावरील वयाच्या कामगारांना आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी राज्य सरकार, बेस्ट, महानगरपालिका कर्मचारी यांच्याप्रमाणे सोई सवलती मिळाव्या. संपुर्ण एसटी कामगारांना आयुष्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथीक गोळ्यांचा डोस द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली आहे.

होमिओपॅथी आर्सेनिक-अल्बम -३० गोळ्या कोरोना बाधित रुग्णांना न देता लहान मुलांपासुन ते वयोवृद्ध तसेच मधुमेह उच्च रक्तदाब आणि ईतर आजार असलेल्या रुग्णांना देण्यात येते. याचा कोणताही साईडफेक्ट होत नाही. एसटी कामगारांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची सर्व एसटी कामगारांना आल्बेनिक अल्बम-३० चा डोस देण्याची विनंती प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून देण्यात आली. 

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या