फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आजपासून ‘बूस्टर’; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनाही देणार डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:11 AM2022-01-10T07:11:47+5:302022-01-10T07:12:00+5:30

सर्व शासकीय, महानगरपालिका, तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी, तसेच थेट येऊन नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध आहे. 

'Booster' Dose for frontline employees from today | फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आजपासून ‘बूस्टर’; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनाही देणार डोस

फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आजपासून ‘बूस्टर’; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनाही देणार डोस

Next

मुंबई : सर्व शासकीय, महापालिका, खासगी लसीकरण केंद्रांवर १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीची बूस्टर मात्रा मिळणार आहे. सर्व शासकीय, महानगरपालिका, तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी, तसेच थेट येऊन नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध आहे. 

लसीचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, तसेच ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांनी दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास, ते १० जानेवारीपासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर (प्रिकॉशन डोस) घेण्यासाठी पात्र असतील. ६० वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना मात्रा घेण्यासाठी केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र दाखविण्याची आवश्यकता नाही. मात्र, अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. 

ओळखपत्र बंधनकारक

नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र, ओळखपत्र सादर करणे बंधनकारक. खासगी केंद्रात लस घ्यायची असल्यास शासकीय केंद्रावर येऊन प्रथम योग्य ती वर्गवारी नोंदवावी आणि नंतर खासगी केंद्रावर लस घेण्याची मुभा असेल.

अशी मिळेल लस 

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी व ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेले व कोविन ॲपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारीऐवजी नागरिक अशी वर्गवारी नोंद झाली आहे, त्यांना शासकीय व महानगरपालिका केंद्रात थेट नोंदणी पद्धतीने लस घेता येईल. 

Web Title: 'Booster' Dose for frontline employees from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.