कोरोनाच्या दहशतीने बूस्टर डोसला ‘बूस्टर’; देशात दुपटीने वाढले तिसरी लस घेणाऱ्यांचे प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:01 AM2022-12-29T06:01:47+5:302022-12-29T06:02:24+5:30
चीन, जपानसह इतर काही देशांमध्ये कोरोनाचा हाहाकार असल्याच्या बातम्या वेगाने पसरू लागल्यानंतर भारतातही त्याची काही प्रमाणात भीती निर्माण होऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चीन, जपानसह इतर काही देशांमध्ये कोरोनाचा हाहाकार असल्याच्या बातम्या वेगाने पसरू लागल्यानंतर भारतातही त्याची काही प्रमाणात भीती निर्माण होऊ लागली आहे. आतापर्यंत बूस्टर डोसकडे दुर्लक्ष करणारेही आता त्यासाठी नोंदणी करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे.
बूस्टर घेण्यात कोण आघाडीवर?
उत्तर प्रदेश ४.४८ कोटी
गुजरात १.९३ कोटी
आंध्र प्रदेश १.८२ कोटी
बिहार १.५८ कोटी
पश्चिम बंगाल १.५७ कोटी
मध्य प्रदेश १.३६ कोटी
तेलंगणा १.३२ कोटी
ओडिशा १.३१ कोटी
कर्नाटका १.०४ कोटी
महाराष्ट्र ९४.७ लाख
महाराष्ट्राला हवा डोस
सर्वाधिक बूस्टर डोस घेणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक दहावा आहे. बूस्टर डोस घेण्यासाठी लोक तयार आहेत, पण लसीच उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बूस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी असल्याचे दिसते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"