महामुंबईला २८ हजार कोटींचा बूस्टर डोस, एमएमआरडीएची अर्थसंकल्पीय तूट ५ हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:04 AM2023-03-11T06:04:59+5:302023-03-11T06:05:23+5:30
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदा माेठी तरतूद
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, अर्थसंकल्पात एकूण खर्च २८ हजार ७०४ कोटी अंदाजित आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने अर्थसंकल्पीय तूट ५ हजार १४ कोटी रुपये एवढी आहे. यापैकी सुमारे ९४ टक्के इतका म्हणजे २७ हजार ०७९ कोटी रूपये निधी हा पायाभूत सुविधा विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक व पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे.
२०२३-२४ या वर्षात सुरू करण्यात येणारे नवीन प्रकल्प
२० काेटी : वर्सोवा-विरार सागरी सेतू
१५०० काेटी : मुंबई शहरातील ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग ते मरिन ड्राईव्ह, सागरी किनारा मार्गापर्यंत भुयारी मार्ग
३००० काेटी : ठाणे ते बोरिवली दरम्यान दोन भुयारी मार्ग
२०० काेटी : मुंबई पारबंदर प्रकल्प ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जोडरस्ता
१०० काेटी : पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील तीन हात नाका जंक्शन येथे वाहतूक सुधारणा करणे
५०० काेटी : बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग (ठाणे कोस्टल रोड)
१००० काेटी : ठाणे, पालघर जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विकास कामे
४४८ काेटी : देहरजी मध्यम प्रकल्प
२५ काेटी : भिवंडी-वाडा रोड राज्यमार्ग (क्र.३५) विश्वभारती नाका ते भिनार ते वडपे
५०० काेटी : छेडानगर-घाटकोपर ते ठाणे पर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण
५०० काेटी : पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत रस्ता
१५० काेटी : कल्याण बाह्यवळण रस्ता भाग - ३
२०२२-२३ मध्ये पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांचा अंदाजित खर्च
१५३३६ काेटी : मुंबई पारबंदर प्रकल्प
१९७७ काेटी : सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
(टप्पा-१ वसई-विरार)
२४९ काेटी : पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) उड्डाणपूल
४८ काेटी : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराज्यीय टर्मिनल (टी १) उड्डाणपूल
१४८ काेटी : सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील
केबल-स्टे पुलाचे तसेच मुंबई विद्यापीठ ते पश्चिम द्रुतगती महामार्गास जोडणाऱ्या उन्नत मार्गाची कामे
१४४१ काेटी : ऐरोली - कटाई नाका रस्ता प्रकल्प
भाग-१ व २
४०० काेटी : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
२२३ काेटी : विस्तारित नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत
मोटागांव-माणकोली रस्त्यावर उल्हासखाडी ओलांडून सहा पदरी पुलाचे बांधकाम
६० काेटी : पारसी पंचायत, जनता वसाहत व आकुर्ली
येथे भुयारी मार्ग