कोरोनाकाळात मंदावलेली अर्थव्यवस्था गेल्या दोन महिन्यांपासून जोर धरू लागली आहे. अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या निवडक क्षेत्रांमध्ये सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे बांधकाम क्षेत्र. या क्षेत्रात आठ वर्षांत प्रथमच तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरे विकत घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाकाळातही हे कसे शक्य झाले, याचा घेतलेला आढावा...
मोठ्या घराची खरेदी आता आवाक्यात
मुंबई : कोरोनामुळे ‘घरून काम’ ही कार्यसंस्कृती आता भारतात मूळ धरू लागली आहे. मात्र, घराचा आकार लहान असल्याने अनेकांना घरून काम करणे तापदायक ठरत आहे. त्यामुळे हौसेने घेतलेले ‘सेकंड होम’ आणि सध्याचे राहते घर विकून आलेल्या रकमेतून एक मोठे घर घेण्याचा विचार बळावू लागला आहे. दोन घरे विकून मिळालेल्या रकमेची गुंतवणूक एका घराच्या खरेदीत केल्यास गुंतवणूकदार प्राप्तिकराच्या कलम ५४ अंतर्गत करसवलतीस पात्र ठरत असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.वांद्रे येथील साबीर अली यांनी त्यांची दोन घरे विकून त्यातून आलेल्या पैशांतून एक मोठे घर विकत घेतले. २०१०-११ या वित्तीत वर्षात हा व्यवहार झाला. अली यांनी प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५४ अंतर्गत करवजावटीसाठी अर्ज केला. संबंधित कलमानुसार आपण करवजावटीसाठी पात्र असल्याचे कारण त्यांनी दिले. मात्र, प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी अली यांचा अर्ज फेटाळून लावत प्राप्तिकर अपिलीय लवादाकडे (आयटीएटी) दाद मागितली. लवादाने मात्र अली यांची बाजू उलचून धरली.
विकासकांकडून आकर्षक योजना
२० : ८० किंवा १० : ९०घरासाठी बुकिंग करताना २० किंवा १० टक्के रक्कम भरायची आणि उर्वरित रक्कम घराचा प्रत्यक्ष ताबा घेताना भरायची
n मोफत मॉड्युलर किचनn मोफत कार पार्किंगn मोफत क्लब मेंबरशीपn लक्झरी हाऊसिंगच्या किमतींत ५ टक्के कपात