Join us

बोरिवली - दहिसर - मागठाणेमधील रस्ते व पूल यांच्या विकासकामांना मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई-बोरिवली, दहिसर मागठाणेमधील अनेक रस्ते व पूल निधी व प्रकल्प मंजुरीअभावी गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-बोरिवली, दहिसर मागठाणेमधील अनेक रस्ते व पूल निधी व प्रकल्प मंजुरीअभावी गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहेत. लहान व मोठ्या रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

सदर समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, यासाठी शिवसेनेचे विभाग क्रमांक एकचे विभागप्रमुख व मागठाणेचे आमदार विलास पोतनीस व आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेच्या आर - उत्तर व आर - मध्य विभागातील नगरसेवकांचा अतिरिक्त आयुक्त वेलारसू यांच्यासमवेत ऑनलाइन संवाद आयोजित करण्यात आला होता.

विभागातील लहान व मोठ्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, मुंबई महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यात विभागातील प्रस्तावित करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे त्वरित करण्यात यावीत, विभागातील लहान व मोठ्या रस्त्यांचे परीक्षण मुंबई महापालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून करण्यात यावे व त्यानुसार रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, म्हाडा अंतर्गत येणारे रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या, पर्जन्यवाहिन्या, जलवाहिन्या यांच्या कामांना म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून गती देण्यात यावी व म्हाडामधील रहिवाशांना दिलासा द्यावा, दहिसर नदीवरील पादचारी व उड्डाणपुलांची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत, दहिसर पूर्वेस सुरू असलेल्या मलनिस्सारण वाहिनीच्या मायक्रोटनेलिंगच्या जोडणी संदर्भातील अडथळे दूर करण्यात यावेत, अशा या विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.