Join us

बोरीवलीतील तोतया डॉक्टर गजाआड

By admin | Published: February 27, 2015 1:37 AM

कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर इंजेक्शन देऊन रु ग्णांना या इंजेक्शनचे व्यसन लावणाऱ्या एका तोतया डॉक्टरला एमएचबी पोलिसांनी अटक केली

मुंबई : कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर इंजेक्शन देऊन रु ग्णांना या इंजेक्शनचे व्यसन लावणाऱ्या एका तोतया डॉक्टरला एमएचबी पोलिसांनी अटक केली. कोणतीही पदवी नसताना हा डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या आयुष्याशी खेळत होता, ही धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.होतीभाई धरमसिंग पटेल (६०) असे त्याचे नाव आहे. गोराई परिसरात असलेल्या बेव्ह्यू कम्पाउंडमध्ये त्याने दवाखाना थाटला होता. वात, गुडघेदुखी तसेच सांधेदुखीसारख्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना तो पेनकिलर इंजेक्शन द्यायचा. त्यामुळे काही काळासाठी त्यांना दुखण्यातून आराम मिळायचा. मात्र त्या इंजेक्शनचा प्रभाव उतरला की, पुन्हा दुखणे सुरू व्हायचे. त्यामुळे नाइलाजास्तव हे रुग्ण इंजेक्शन घेण्यासाठी पुन्हा पटेलकडे यायचे. पुन्हा तो त्यांना तेच इंजेक्शन द्यायचा. एका इंजेक्शनमागे तो २०० ते ३०० रुपये आकारायचा. दिवसभरात त्याच्याकडे १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी मुंबईभरातून यायचे. पटेलची तोतयागिरी पोलिसांच्या लक्षात येताच ही कारवाई करण्यात आली.