बोरीवलीत वृद्धाची हत्या, दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:27 AM2019-04-20T01:27:14+5:302019-04-20T01:27:18+5:30

सत्तर वर्षीय वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडला.

 Borivali murder case, filed against two unknown persons | बोरीवलीत वृद्धाची हत्या, दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

बोरीवलीत वृद्धाची हत्या, दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

Next

मुंबई : सत्तर वर्षीय वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडला. संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच या हत्येमागे दोघांचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून, त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे.
वामन मनोहर जोशी (७०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते त्यांच्या बत्तीस वर्षीय मुलासोबत बोरीवली पश्चिम परिसरात जामुनी गल्ली परिसरात राहत होते. त्यांच्या मुलाचा या ठिकाणी खाऊचा स्टॉल आहे.
राहत्या घरात गुरुवारी रात्री ते मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. जोशी मुलासोबतच सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण घ्यायचे. मात्र गुरुवारी दुपारी तीन वाजून गेले तरी ते दुकानावर आले नाहीत. तसेच ते फोनही उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा घरी त्यांना पाहायला गेला. तेव्हा ते घरातल्या सोफ्यावर निपचीत पडलेले त्याला दिसले. याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल करविले. तेथे त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानुसार या प्रकरणी नंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची हत्या झाली त्या वेळी दोन इसम त्या ठिकाणी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. सध्या या प्रकरणी त्याच्या मुलाकडे पोलीस चौकशी करत आहेत.

Web Title:  Borivali murder case, filed against two unknown persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.