बोरीवलीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:35 AM2021-02-05T04:35:42+5:302021-02-05T04:35:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवलीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उत्तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवलीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रेरणेने आणि पोयसर जिमखाना यांच्या वतीने धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. पोयसर जिमखाना स्थापना दिन आणि संयुक्त जयंतीचे औचित्य साधत उत्तर मुंबईतील २६ ज्येष्ठ पोलीस अधिकारी, ४ डॉक्टर्स यांचा कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल साग्रसंगीत सत्कार प्रमुख अतिथी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक वाय.सी. पवार आणि विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. पराग अळवणी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका पल्लवी केळकर यांच्या जयोस्तुते या स्फूर्तिगीताने झाली. दर्शन महाजन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर नाटिका सादर केली. वाय.सी. पवार यांनीही खास या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. निवृत्तीनंतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये अग्रेसर राहून निरंतर सेवेत कार्यमग्न राहिल्याबद्दल खासदार शेट्टी यांनी रु.२५०००चा धनादेश त्यांच्या संस्थेला दिला. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, जिल्हा महासचिव दिलीप पंडित यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिमखाना पदाधिकारी सर्वस्वी मुकेश भंडारी, करुणाकर शेट्टी, हर्षादभाई मेहता, महेश राऊत, नितीन प्रधान, दीपक पाटणेकर, राजेश भट्ट, नैनेश शाह, शेखर अहिरे, मितेश प्रजापती यांचे गोपाळ शेट्टी यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निषाद कोरा यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश राऊत यांनी केले.
--------------------------------------------