Join us  

बोरिवलीचा डॉ.शामा प्रसाद मुखर्जी चौक मनपाने रेलिंग टाकून केला बंदिस्त

By मनोहर कुंभेजकर | Published: June 20, 2024 12:58 PM

बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पुलाचे खाली डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी चौकात मुंबई महानगर पालिकेने लाखो रुपये खर्चून एक तथाकथित वाचनालय बांधले आहे त्या जागेचा  गैरवापर होत असून भिकरी व गर्दुल्ले यांचा अड्डा बनला होता.

मुंबई - बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पुलाचे खाली डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी चौकात मुंबई महानगर पालिकेने लाखो रुपये खर्चून एक तथाकथित वाचनालय बांधले आहे त्या जागेचा  गैरवापर होत असून भिकरी व गर्दुल्ले यांचा अड्डा बनला होता. याबाबत लोकमत ऑनलाईनमध्ये दि. १७ जून व दैनिक लोकमतच्या दि. १८ जूनच्या अंकात सविस्तर प्रसिद्ध झाले होते.

या ठिकाणी जन.करिअप्पा उड्डाण पूलाखालील भागात भिकारी, गर्दुल्ले यांच्या झोपण्याची सोय म्हणून होत होता. भिकारी, गर्दुल्ले यांच्या वास्तव्याने हा परिसर अस्वच्छ व असुरक्षित झाला होता याला मुंबई महापालिका व स्थानिक पोलिस जबाबदार नाहीत का ? ते बांधण्याचे नक्की प्रयोजन काय?असा सवाल करत बोरिवली भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर परांजपे यांनी  या विरोधात भाजपा तर्फे आंदोलन देखील करण्यात येईल असा इशाराही  दिला होता.

बोरीवली पश्चिम पोलिस ठाण्याचे कायदा व सुरक्षा विभागाचे  पोलिस निरीक्षक संजय लाड यांनी देखील तातडीने याची दखल घेत कारवाई केली. तसेच मुंबई महापालिकेच्या परिमंडळ ७ च्या उपायुक्त डॉ भाग्यश्री कापसे यांनी देखील ताबडतोब लक्ष घालून भिकारी, गर्दुल्ले वापरत असलेला परिसर लोखंडी रेलिंग टाकून त्वरित बंद केला. वरील संदर्भात त्वरित कारवाई झाल्यामुळे मनपा उपायुक्त व पोलीस प्रशासनाचे तसेच या वृत्ताला वाचा फोडणाऱ्या लोकमतचे भाजप व बोरिवली नागरिकांनी धन्यवाद दिले असून समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :मुंबई