Join us

बोरिवलीचे कोविड सेंटर बनले रुग्णांचे आधारवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 4:58 PM

Corona News : रुग्णाने मानले सोशल मीडियावरून कोविड सेंटरचे आभार

मनोहर कुंभेजकर

मुंबई: पालिका प्रशासन देत असलेल्या चांगल्या सुविधांबद्धल कौतुकाचे गोड शब्द फार कमी वेळा कानावर पडतात. मात् आर मध्य वॉर्डच्या बोरीवली पश्चिम पंजाबी लेन येथील कोविड सेंटरच्या सुविधांबद्धल चक्क येथील एका कोविड रुग्णांने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या कोविड सेंटर बद्धल गौरवोद्गार काढले आहेत.

पालिकेचा आर मध्य वॉर्ड  मध्ये बोरिवली पश्चिम व पूर्वेचा भाग मोडतो.या वॉर्डची लोलसंख्या सुमारे 10 लाखांच्या आसपास आहे. गेल्या सप्टेंबर पर्यंत हा वॉर्ड कोविडचा हॉटस्पॉट होता. परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सहाय्यक पालिका आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे  व परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता राजेश आक्रे,कार्यकारी वैद्यकीय अधिकारी आणि या वॉर्डचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेली आठ महिने अविरत मेहनत घेतल्याने येथील कोरोना रुग्णांची संख्या आता चांगलीच कमी झाली आहे.

 बोरिवली पश्चिम पंजाबी लेन मधील 200 खाटांचे पालिकेचे कोविड सेंटर येथील कोविड रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी व आमदार-विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या हस्ते गेल्या एप्रिल मध्ये या कोविड सेंटरचे लोकार्पण झाले होते.आतापर्यंत येथे सुमारे दोन ते अडीच हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

कोविड उपचारासाठी खाजगी इस्पितळात रुग्णांना कमीत कमी ४ ते ५ लाख रुपये मोजावे लागतात. मात्र पालिकेच्या कोविड सेंटर मध्ये रुग्णांवर मोफत उपचार होतात. सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णांलयांपेक्षा पालिकेच्या रुग्णांलयात किंवा कोविड सेंटर मध्ये उपचार घेणे पसंत करतात.

या आजाराची लागण एका रुग्णाला झाली. टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तसा फोन सदर रुग्णाला  आर/सेंट्रल च्या कोविड टीम कडून आला. पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये  दाखल होण्याची त्यांनी तयारी दाखविताच फोन ठेवल्या क्षणा पासून अगदी पंधरा मिनिटातच आर/सेंट्रल वॉर्डची पीक अप व्हॅन इमारतीत आली आणि मला पंजाबी गल्ली,बोरिवली पश्चिम येथे असलेल्या विलगीकरण कक्षात या रुग्णाला दाखल करण्यात आले. तिथे गेल्यावर माझं तिथे असलेल्या डॉक्टरांनी तपासणी करून लगेच औषधे सुरू केर्ली. हे सगळे होईपर्यंत या रुग्णांचे घर आणि विंगचे सॅनिटायझेशन देखिल झाले. इतकी तत्पर आणि चांगली सेवा आर/सेंट्रल वार्ड मधून  मिळते याचा आता प्रत्यय आला असे गौरवोद्गार या रुग्णाने चक्क सोशल मीडियावर जारी केलेल्या पोस्ट मध्ये काढले आहे

 आठ दिवस सदर रुग्ण हा येथील विलगीकरण कक्षात होता.त्या आठ दिवसात आर / सेंट्रल वॉर्ड कडून रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा सुद्धा वाखाणण्याजोग्या होत्या. सकाळचा नाश्ता, दुपारी व संध्याकाळचे सकस जेवण, विलगीकरणं केंद्रांची साफ़-सफाई सुद्धा वेळच्यावेळी होत होती. तिथे काम करणारा प्रत्येक कामगार, मेडिकल-स्टाफ, आणि डॉक्टर सुध्दा त्यांच्या जवाबदारी पूर्ण आणि वेळच्यावेळी पार पाडत होते.आर/सेंट्रल वॉर्डच्या कोव्हिड टीमला या रुग्णाने मनाचा मुजरा केला आहे.

 जर कोणाला कोविडची लागण झाली तर बोरिवलीकरांनी तरी आर/सेंट्रल ची मदत घेण्यास काहीच हरकत नाही असे आवाहन देखिल सदर रुग्णाने सोशल मीडियाच्या माध्यमातून बोरीवलीकरांना केले आहे.

या कोविड सेण्टरच्या विक्रमी वेळेत उभारणीत आणि कार्यान्वित करण्यात पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार तसेच सहाय्यक आयुक्त डॉ भाग्यश्री कापसे आणि सहाय्यक अभियंता राजेश अक्रे यांचे अविरत प्रयत्न आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकमुंबई महानगरपालिकाबोरिवली