Join us  

बोरीवली, अंधेरी सर्वाधिक गर्दीची स्थानके

By admin | Published: November 05, 2015 2:00 AM

मध्य रेल्वेवरील दिवा आणि डोंबिवली स्थानके गर्दीची म्हणून उघड झाल्यावर पश्चिम रेल्वेवरील १० स्थानकेही तुडुंब गर्दीने भरून गेल्याचे आढळले आहे. यात सर्वाधिक बोरीवली आणि

मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा आणि डोंबिवली स्थानके गर्दीची म्हणून उघड झाल्यावर पश्चिम रेल्वेवरील १० स्थानकेही तुडुंब गर्दीने भरून गेल्याचे आढळले आहे. यात सर्वाधिक बोरीवली आणि अंधेरी या स्थानकांत गर्दी होत असल्याचे पश्चिम रेल्वेचे अधिकारी सांगतात. बोरीवली स्थानकातून वर्षाला चार कोटींपेक्षा आणि अंधेरी स्थानकातून ३ कोटींपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि त्यापुढील शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुले उभी राहिली. मध्य रेल्वेवर गर्दीचे हे चित्र असतानाच पश्चिम रेल्वेवरही अशीच परिस्थिती दिसून येते. बोरीवली आणि त्यापुढील मार्गावरील स्थानकातून डाऊन किंवा अप मार्गावरून प्रवास करताना मोठ्या गर्दीला सामोरे जावे लागते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत तर अंधेरी ते विरारपर्यंतच्या स्थानकांतून लोकल पकडणेही शक्य होत नाही. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी वारंवार होते. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली, अंधेरी या स्थानकांतून लोकल पकडणे म्हणजे दिव्यच असते. या स्थानकात सर्वाधिक गर्दी वाढल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. तिकिट विक्रीमध्ये बोरिवली आणि अंधेरी स्थानकांचा नंबर सर्वात वरती असून भार्इंदर, बोईसर, सांताक्रूझ, मीरा रोड, वांद्रे, चर्चगेट या स्थानकांचा नंबर लागतो. पश्चिम रेल्वेचा विचार करता प्रत्येक डब्यामध्ये क्षमतेपेक्षा फारच जास्त प्रवासी प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. गर्दीच्या वेळेस ही गर्दी अधिकच वाढते. एलिव्हेटेड मार्गाप्रमाणे काही उपाययोजना राबविली गेली तर या चित्रामध्ये बदल होईल अशी आशा पश्चिम रेल्वेचे प्रवासी करत आहेत. (प्रतिनिधी)फेऱ्या वाढवणे अशक्य : पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या ८५ लोकलच्या १,३00 फेऱ्या होत आहेत. या फेऱ्यांमध्ये यापुढे वाढ होणे अशक्य असल्याचे अधिकारी सांगतात. सध्या तीन ते चार मिनिटांनंतर फेऱ्या आहेत. फेऱ्या वाढवल्यास लोकलचा वेग मंदावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्या बम्बार्डियर लोकल मिळणारएमयूटीपी-२ अंतर्गत ७२ नव्या बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेला मिळणार आहेत. यात ९ लोकल आल्या असून, उर्वरित २२ लोकल मार्च २0१६ पर्यंत येतील. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना ते फायदेशीर ठरणार आहे. फायदेशीर एलिव्हेटेड प्रकल्पाला कात्रीपश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेला समांतर असा चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाचा प्रस्ताव रेल्वेकडून बनविण्यात आला होता. मात्र कुलाबा-वान्द्रे-सीप्झ असा मेट्रो-३चा प्रकल्प होत असून, त्यामुळे रेल्वेच्या एलिव्हेटेड प्रकल्पाला कात्री लावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प अंधेरी किंवा बोरीवलीपासून तयार करण्याचा विचार सुरू असून तसा सर्व्हेही केला जात आहे. २00७ सालापासून प्रवासीसंख्येत वाढ२00७ सालापासून गर्दीच्या वेळेत लोकल सेवा २३ टक्क्यांनी वाढली आहे, तर प्रवासीसंख्येत १२.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच वर्षापासून २00७ रोजी प्रत्येकी एका डब्यातून २८७ प्रवाशांचा प्रवास होत आहे. एका डब्याची प्रवासी क्षमता ही फारच वाढली असून, त्यामुळे प्रवास कठीण होत चालल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. सर्वात जास्त तिकिटे-पासची विक्री होणारी स्थानकेस्थानक२0१४-१५ २0१५-१६एकूण तिकिटे/ एकूण तिकिटे/पास विक्री पास विक्रीचर्चगेट२,१३,८३,00१ १,६२,३४,४५७बोरीवली४,६२,७१,६४३ ४,२६,८६,0४९भार्इंदर२,९१,३३,२६३ २,६२,७७,९१९वान्द्रे२,२४,७९,२६४ १,९९,३५,९९९सान्ताक्रूझ२,२४,७९,0७७ २,0९,0६,३४३मीरा रोड१,८३,५४,२९0 १,७0,८१,६६४बोईसर२,0५,५८,0७५ १,९७,७५,८८९अंधेरी३,७७,९६,७६८ ३,७२,५७,६४२