बोरीवली ठरले सर्वाधिक गर्दीचे स्थानक

By admin | Published: January 5, 2016 02:46 AM2016-01-05T02:46:58+5:302016-01-05T02:46:58+5:30

पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले आहे. या स्थानकातून दररोज २ लाख ८७ हजार १९६ प्रवासी प्रवास करतात.

Borivli is the most crowded station | बोरीवली ठरले सर्वाधिक गर्दीचे स्थानक

बोरीवली ठरले सर्वाधिक गर्दीचे स्थानक

Next

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले आहे. या स्थानकातून दररोज २ लाख ८७ हजार १९६ प्रवासी प्रवास करतात. ही माहीती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून आरटीआयअंतर्गत उपलब्ध करण्यात आली. यातून पश्चिम रेल्वेला दररोज १ कोटी ९९ लाख ४६ हजार ६५२ रुपये उत्पन्नही मिळत असल्याचेही समोर आले आहे.
चर्चगेट ते डहाणूपर्यंत ३६ स्थानके आहेत. या सर्व स्थानकातून दिवसाला ३५ लाख ८ हजार ४६९ प्रवासी प्रवास करतात. यात एकट्या बोरीवली स्थानकातून २ लाख ८७ हजार १९६ प्रवासी प्रवास करत आहेत. त्यानंतर अंधेरी स्थानकाचा नंबर लागत असून या स्थानकातून २ लाख ५६ हजार ७७१, नालासोपारा स्थानकातून २ लाख २ हजार ९0३, विरार स्थानकातून १ लाख ८३ हजार ४५६, भार्इंदर स्थानकातून १ लाख ७६ हजार ८४४ प्रवासी प्रवास करतात. वैतरणा, वनगाव आणि केळवे रोड स्थानक सर्वात कमी गर्दीची स्थानके ठरल्याची माहीतीही समोर आली आहे.
पश्चिम रेल्वेचे दररोजचे उत्पन्नही १ कोटी ९९ लाख ४६ हजार ६५२ एवढे असून यात बोरीवलीने प्रथम क्रमांक पटकविला आहे. बोरीवलीचे दररोजचे उत्पन्न १६ लाख ८६ हजार ५९१ असून अंधेरी स्थानकाचे उत्पन्न हे १४ लाख ८८ हजार ८४५ रुपये एवढे आहे. त्यानंतर नालासोपारा १३ लाख ५२ हजार ५८७, विरार स्थानकाचे १३ लाख ३३ हजार ७३३ आणि भार्इंदर स्थानकाचे ९ लाख ९५ हजार १२१ रुपये असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Borivli is the most crowded station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.