- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली स्थानकावरील गुंतागुंतीचे फलाट क्रमांक आता सोयीचे करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. तब्बल १० फलाटांचा समावेश असलेल्या बोरीवली स्थानकावर प्रवाशांना सोपे जाईल, अशा स्वरूपात फलाटांना क्रमांक देण्यात येणार आहेत. फलाटांच्या या नवीन क्रमांकांची अंमलबजावणी ३ आणि ४ जूनच्या मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे.बोरीवली पश्चिमेकडील विरारच्या दिशेने सुरू होणाऱ्या फलाटाचा क्रमांक १ आहे. त्याला जोडूनच खालोखाल दुसरा आणि त्यापुढे तिसरा फलाट असून, या फलाटांचे क्रमांक अनुक्रमे ७ आणि ८ असे आहेत. हे फलाट लोकल ट्रेनच्या वापरासाठी आहेत. तर फलाट क्रमांक १ पासून पुढे पूर्वेच्या दिशेने २ ते ६, ‘६ अ’ आणि ‘६ अ होम’ असे फलाट आहेत. यापैकी ६ अ आणि ६ अ होम हे फलाट एक्स्प्रेस ट्रेनसाठी वापरले जात आहेत. बोरीवली परिसरातील स्थानिकांना या फलाट क्रमांकाचा त्रास होत होता. स्थानिकांनी याबाबत परेकडे फलाट क्रमांक बदलण्याची मागणी केली होती. परेने ही मागणी त्वरित मान्य करत, क्रमांक बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. नवीन फलाट क्रमांक ३ आणि ४ जूनच्या मध्यरात्री कार्यान्वित होणार आहेत.फलाट क्रमांकजुने नवे८ १७ २१ ३२ ४३ ५४६५७६८६ अ९६ अ (होम) १०