बोरला घाटला व्हिलेजची पोटनिवडणूक रविवारी

By Admin | Published: January 9, 2016 03:01 AM2016-01-09T03:01:19+5:302016-01-09T03:01:19+5:30

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका अंतर्गत बोरला घाटला व्हिलेज प्रभाग क्रमांक १४७ची पोटनिवडणूक रविवारी (१० जानेवारी) होणार आहे.

Borla Ghatla Village byelection on Sunday | बोरला घाटला व्हिलेजची पोटनिवडणूक रविवारी

बोरला घाटला व्हिलेजची पोटनिवडणूक रविवारी

googlenewsNext

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका अंतर्गत बोरला घाटला व्हिलेज प्रभाग क्रमांक १४७ची पोटनिवडणूक रविवारी (१० जानेवारी) होणार आहे. या एका जागेकरिता एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यासाठी ३९ मतदार केंद्रांवर मतदान होणार
आहे.
प्रभाग क्रमांक १४७चे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने ही
जागा रिक्त झाली आहे. या
नगरसेवक पदासाठी आता पोटनिवडणूक होत आहे. या प्रभागात एकूण मतदारसंख्या ४५ हजार ७२३ इतकी आहे.
यामध्ये स्त्री मतदार २0 हजार ६३१ तर पुरुष मतदार २५ हजार १०० आणि इतर मतदार १ असे आहेत. एकूण ६ मुख्य मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीकरिता एकूण ३९ मतदान केंद्रे असतील. १० जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार असून, ११ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Borla Ghatla Village byelection on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.