मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका अंतर्गत बोरला घाटला व्हिलेज प्रभाग क्रमांक १४७ची पोटनिवडणूक रविवारी (१० जानेवारी) होणार आहे. या एका जागेकरिता एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यासाठी ३९ मतदार केंद्रांवर मतदान होणार आहे.प्रभाग क्रमांक १४७चे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. यानगरसेवक पदासाठी आता पोटनिवडणूक होत आहे. या प्रभागात एकूण मतदारसंख्या ४५ हजार ७२३ इतकी आहे. यामध्ये स्त्री मतदार २0 हजार ६३१ तर पुरुष मतदार २५ हजार १०० आणि इतर मतदार १ असे आहेत. एकूण ६ मुख्य मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीकरिता एकूण ३९ मतदान केंद्रे असतील. १० जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार असून, ११ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)
बोरला घाटला व्हिलेजची पोटनिवडणूक रविवारी
By admin | Published: January 09, 2016 3:01 AM