उधारीचा पैसा...दोघात वाद; मात्र तिसऱ्यावर गोळीबार, मुंबईतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 03:46 PM2022-09-11T15:46:58+5:302022-09-11T15:50:02+5:30

निर्मलनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध

Borrowed money...double argument; But firing on the third, a shocking incident in Mumbai | उधारीचा पैसा...दोघात वाद; मात्र तिसऱ्यावर गोळीबार, मुंबईतील धक्कादायक घटना

उधारीचा पैसा...दोघात वाद; मात्र तिसऱ्यावर गोळीबार, मुंबईतील धक्कादायक घटना

Next

मुंबई : उधारीचे पैसे परत करण्याचा सल्ला देणे एका ज्येष्ठ नागरिकाच्या जिवावर बेतले. कारण कर्ज घेणाऱ्याने त्याच्यावर गोळीबार करत त्याला जखमी केले. वांद्रे परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी निर्मलनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जखमी व्यक्तीचे नाव शमशाद अहमद रियाझ अहमद (वय ६०) असे असून, पसार आरोपी सोबत त्यांची १५ वर्षांपासून मैत्री आहे. आरोपीने एका व्यक्तीकडून १० हजार रुपयांची रक्कम उधारीवर घेतली होती. मात्र, ते पैसे त्याने परत केले पसार नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्तीने अहमद यांना सांगत मध्यस्थी करत पैसे परत करण्याबाबत समजविण्यास सांगितले. 

त्यानुसार त्यांनी आरोपीची समजूत काढली. त्याचा राग मनात ठेवत गुरुवारी रात्री अहमद हे बेहरामपाडा याठिकाणी स्थानिकांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या मागून आला आणि जवळ असलेल्या बंदुकीने पॉइंट ब्लैक गोळीबार करत झाला. यात अहमद यांच्या खांद्याला दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने अनेकांकडून उधारीवर पैसे घेत ते परत केलेले नाहीत. तो वांद्रे पूर्व परिसरात रेल्वे क्वॉर्टरमध्ये राहतो.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण-

ऐन सणासुदीच्या दिवसात गोळीबार झाल्याचा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानुसार लवकरच हल्लेखोराच्या मुसक्या आम्ही आवळू असे वरिष्ठ अधिकायांनी नमूद केले.

Web Title: Borrowed money...double argument; But firing on the third, a shocking incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.