मानखुर्दमधील दोघांना अटक

By admin | Published: March 17, 2017 04:57 AM2017-03-17T04:57:36+5:302017-03-17T04:57:36+5:30

फोनकॉलवर रुग्णालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघांना दोन दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांनी मानखुर्द येथून अटक केली आहे

Both arrested in Mankhurd | मानखुर्दमधील दोघांना अटक

मानखुर्दमधील दोघांना अटक

Next

मुंबई : फोनकॉलवर रुग्णालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघांना दोन दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांनी मानखुर्द येथून अटक केली आहे. वाहीद खान आणि शाहीद शेख अशी या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
गुजरातमधील अवकार या नामांकित रुग्णालयात कॉल करून हे रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी २ मार्चला एका अज्ञात इसमाने दिली होती. याबाबत गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल करत या फोनचा तपास सुरू केला.
दरम्यान, मानखुर्द परिसरात राहणाऱ्या शाहीद शेख या इसमाच्या नावावर हे सीमकार्ड निघाले. गुजरात पोलिसांनी शिवाजी नगर पोलिसांच्या मदतीने या आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आपल्याकडे असा नंबरच नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून याच परिसरातील वाहीद खान या सीमकार्ड विक्रेत्यालादेखील ताब्यात घेतले.
वाहीदने बनावट कागदपत्रांच्या आधारे हे सीमकार्ड अन्य एका इसमाला विकले. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीचादेखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यानुसार
गुजरात पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी गुजरातमधील साबरमती येथे नेल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Both arrested in Mankhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.