लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंटरनेटवर अश्लील व्हिडिओप्रकरणी सात ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रॉडक्शन हाऊसविरोधात महाराष्ट्र सायबरने गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
महिलांचे अश्लील व्हिडिओ वेबसाइट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जात आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सायबरने सात ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रॉडक्शन हाऊसविरोधात भा.दं.वि. कलम २९२, ६७ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गेल्या वर्षी ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात शुक्रवारी मुक्त छायाचित्रकार, महिला क्रिएटिव्ह डायरेक्टरला अटक करण्यात आली आहे. दोघेही मोबाइल ॲप कंपनीत नोकरीला आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.