बोगस सिम कार्ड विकणाऱ्या दोघांना अटक

By admin | Published: February 9, 2015 02:05 AM2015-02-09T02:05:17+5:302015-02-09T02:05:17+5:30

गेल्या महिन्यात समुद्रमार्गे सिम कार्डे आणून ती बोगस नावे विकण्याच्या तयारीत असलेल्या ७१ वर्षीय अब्दुल खान व डीलर रमेश जैनला येलो गेट पोलिसांनी अटक केली

Both arrested for selling bogus SIM cards | बोगस सिम कार्ड विकणाऱ्या दोघांना अटक

बोगस सिम कार्ड विकणाऱ्या दोघांना अटक

Next

मुंबई : गेल्या महिन्यात समुद्रमार्गे सिम कार्डे आणून ती बोगस नावे विकण्याच्या तयारीत असलेल्या ७१ वर्षीय अब्दुल खान व डीलर रमेश जैनला येलो गेट पोलिसांनी अटक केली असून, हे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
खान हा २३ जानेवारीला ग्लोरीया शिपने सकाळी दहाच्या सुमारास इंदिरा डॉकला उतरला. त्या वेळी त्याची झडती घेण्यात आली. त्यात त्याच्याकडे १४ सिम कार्डे सापडली. याप्रकरणी येलोगेट पोलिसांनी त्याची चौकशी केली. खान ही सिम कार्डे बोगस नावे विकणार असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार त्याच्यावर फसवूणक व इतर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी डीलर जैनलाही अटक झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Both arrested for selling bogus SIM cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.