Join us

मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या १० मे रोजी बंद; एअरपोर्ट अथॉरिटीचं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 1:23 PM

प्रवाशांनी १० मे रोजीच्या शेड्युल्ड फ्लाइट्सबाबत संबंधित एअरलाईनकडे चौकशी करावी असं आवाहन केले आहे.

मुंबई – मान्सूनच्या आगमनापूर्वी सर्व प्राधिकरण नियोजित कामे पार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबई महापालिकेनेही नालेसफाईची सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४० टक्क्याहून अधिक नालेसफाई झाल्याचं समोर आलं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पावसाळ्यापूर्वीची कामं करण्यासाठी १० मे रोजी दोन्ही धावपट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई विमानतळावरील रनवे RWY 14/32 आणि 09/27 १० मे २०२२ रोजी मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कार्यरत नसणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या बंद असतील. याबाबत विमानतळ प्राधिकरणानं नोटीस जारी केली आहे. संध्याकाळी ७ नंतर सर्व सेवा पुन्हा सुरळीत नेहमीप्रमाणे सुरू होतील. त्यामुळे प्रवाशांनी १० मे रोजीच्या शेड्युल्ड फ्लाइट्सबाबत संबंधित एअरलाईनकडे चौकशी करावी असं आवाहन केले आहे. आपत्कालीन ऑपरेशनमध्ये विमानतळावरील धावपट्टी वर्षातून एकदा बंद केली जाते. जेणेकरून धावपट्टीची देखभाल आणि दुरुस्ती करून आवश्यक त्या सुरक्षा घेणे शक्य होते.

टॅग्स :विमानतळ