तासाभरात दोघींचे मंगळसूत्र हिसकावले

By admin | Published: July 6, 2017 07:01 AM2017-07-06T07:01:54+5:302017-07-06T07:01:54+5:30

अवघ्या तासाभरात दोन दुचाकीस्वार तरुणांनी मुलुंड आणि विक्रोळीतील वृद्धेसह दोन महिलांना मारहाण करून त्यांचे मंगळसूत्र

Both of them mangulasutra hijacked within an hour | तासाभरात दोघींचे मंगळसूत्र हिसकावले

तासाभरात दोघींचे मंगळसूत्र हिसकावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अवघ्या तासाभरात दोन दुचाकीस्वार तरुणांनी मुलुंड आणि विक्रोळीतील वृद्धेसह दोन महिलांना मारहाण करून त्यांचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी नवघर आणि विक्रोळी पोलीस ठाण्यांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी एकच असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर २ येथील रहिवासी असलेल्या स्वरूपा दासरी (६०) या मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास शतपावली करत होत्या. येथील स्वयंभू मंदिराकडून जात असताना मागाहून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडविले. त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. यामध्ये त्यांची १ लाख १२ हजार किमतीची ४ तोळ्यांची सोनसाखळी चोरी करून पळ काढला. दासरी यांनी तत्काळ विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांची तक्रार नोंदविण्याचे काम सुरू असताना मुलुंडमध्ये दुसरी सोनसाखळी चोरीची घटना घडल्याचे समोर आले.
अवघ्या तासाभरातच रात्री पावणे दहाच्या सुमारास मुलुंड पूर्वेकडील गवाणपाडा येथून जात असलेल्या जयमाला वैती (४४) यांची सोनसाखळी हिसकावण्यात आली. या वेळी त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती. यामध्ये त्यांचे २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरी झाले आहे. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Both of them mangulasutra hijacked within an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.