Join us

महिला पत्रकार विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

By admin | Published: July 18, 2015 3:57 AM

सांताकू्रझच्या गोळीबार परिसरात लागलेल्या आगीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला मारहाण करून तिचा विनयभंग

मुंबई: सांताकू्रझच्या गोळीबार परिसरात लागलेल्या आगीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अजून दोघांना शुक्रवारी निर्मल नगर पोलिसांनी अटक केली. एक जण फरार असून, अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे.अयाज अन्सारी (२३) आणि कयूम अयूब शेख (२२) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असल्याची माहिती निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर जांबवडेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. तर याप्रकरणी अजून एक जण फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्सारी आणि शेख हे दोघ गोळीबार परिसरात राहत असून, ते दोघेही बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी महिला पत्रकारांसह अन्य माध्यमाच्या प्रतिनिधींना मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंग केल्याच्या प्रकरणात सलमान शेखसह या दोघांचाही हात असल्याची प्राथमिक माहिती हाती आली होती, त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली . पत्रकारांवर गुरुवारी हल्ला झाल्यानंतर हे प्रकरण ‘झीरो झीरो’वर वाकोला पोलिसांनी दाखल करून घेतले होते. जे आता निर्मल नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे वाकोल्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव व्हावळे यांनी सांगितले. दरम्यान सलमान आणि अयाज या दोघांनाही शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)