माजी नगरसेवक हत्येप्रकरणी दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:48 AM2018-03-16T02:48:19+5:302018-03-16T02:48:19+5:30

समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत (६२) यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या जगदीश पवार उर्फ जग्या या मुख्य संशयित आरोपीसह त्याचा साथीदार अभिषेक माने उर्फ ब्लॅकी या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली.

Both of them were arrested in connection with the murder of former corporator | माजी नगरसेवक हत्येप्रकरणी दोघे अटकेत

माजी नगरसेवक हत्येप्रकरणी दोघे अटकेत

Next

मुंबई : समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत (६२) यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या जगदीश पवार उर्फ जग्या या मुख्य संशयित आरोपीसह त्याचा साथीदार अभिषेक माने उर्फ ब्लॅकी या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. सांगलीमधून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई समतानगर पोलिसांनी केली असून ते दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पवार आणि माने हे दोघे सावंत यांच्या हत्येनंतर फरार होते. त्यामुळे समतानगर पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. पवार आणि माने हे सांगलीत एका बसमध्ये दिसल्याची माहिती समतानगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक सांगलीला रवाना झाले. सांगलीमध्ये सापळा रचून त्यांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना मुंबईत न्यायालयासमोर हजर केले. त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही फरार आरोपींना सांगलीतून ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ७ जानेवारी रोजी कांदिवलीतील घरापासून काही अंतरावर सावंत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलगा, माजी पोलीस कर्मचारी दीपक हनवते (५०) यांच्यासह पाच जणांना आधी अटक करण्यात आली आहे.

Web Title: Both of them were arrested in connection with the murder of former corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.