‘ते’ दोघे ठरले पोलीस लाइनमधील खरे हिरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:00 AM2017-12-13T02:00:31+5:302017-12-13T02:00:40+5:30

भायखळा पोलीस वसाहतीमधील दोन मित्रांनी जीवाची पर्वा न करता, चोराला पकडण्यासाठी केलेल्या खटाटोपामुळे चोर पकडले गेले आणि ते दोन मित्र पोलीस वसाहतीतील खरे हिरो ठरले.

Both of them were the real heroes of the police line | ‘ते’ दोघे ठरले पोलीस लाइनमधील खरे हिरो

‘ते’ दोघे ठरले पोलीस लाइनमधील खरे हिरो

Next

मुंबई : भायखळा पोलीस वसाहतीमधील दोन मित्रांनी जीवाची पर्वा न करता, चोराला पकडण्यासाठी केलेल्या खटाटोपामुळे चोर पकडले गेले आणि ते दोन मित्र पोलीस वसाहतीतील खरे हिरो ठरले.
राहुल चेचर आणि राजेंद्र तावडे अशी दोन मित्रांची नावे आहेत. राहुल खासगी कंपनीत, तर राजेंद्र हे एटीएसमध्ये काम करतात. शुक्रवारी वसाहतीमध्ये संतोष गायकवाड (३२) आणि युसूफनूर इस्माइल शेख (३४) या दोन चोरांनी धुमाकूळ घातला. तासाभराच्या थरारानंतर दोघांनाही अटक केली.
या घटनेबाबत राहुलने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणारा मित्र विक्रम माने पत्नीसह गावी निघाला. मात्र, ९ तारखेला रात्री त्यांचा भाऊ परदेशातून येणार असल्याने त्यांनी चावी आमच्याकडेच ठेवली. शुक्रवारी पहाटे माझ्या पत्नीला काहीतरी पडण्याचा आवाज आला. तिने मला उठविले. मी खिडकीतून बाहेर डोकावले. तेव्हा मानेच्या घरातली लाइट सुरू असून, एक जण बाहेर पहारा देत असल्याचे दिसले. चोर शिरल्याचे समजताच आधी राजेंदला फोन फिरवून घटनास्थळी येण्यास सांगितले. काही वेळाने दुसराही चोर त्यांच्या घरात गेला. हीच संधी साधून मी बाहेरून दरवाजाला कडी लावण्याचे ठरविले. मात्र, मी एकटाच आणि ते दोघे. धाडस करत मी दरवाजा बाहेरून ओढून घेण्याचा प्रयत्न केला. चोरांनीही आतून जोराने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मला बाहेरून कडी लावण्यात यश आले.
दोन्हीही चोरांनी खिडकीतून पळण्याचा प्रयत्न केला.राजेंद्रने खिडकीकडे धाव घेतली. दोन्ही बाजूने अडकल्याचे समजताच चोरांनी ब्लेडने त्यांच्याच हातावर, मानेवर वार करण्यास सुरुवात केली. तर कपडे जाळून आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलीसही तेथे दाखल झाले. अखेर चोरांनी शरणागती पत्करल्याचे राहुलने सांगितले. यापूर्वीही दोन चोरीच्या घटना कॉलनीत घडल्या होत्या. त्यामुळे चोरांना पकडणे गरजेचे होते. त्या क्षणाला फक्त चोरांना पकडणे एवढाच उद्देश होता म्हणून ते पकडले गेल्याचे राहुलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आम्हाला विशाल जाधव, दिनेश निकम, विनित वाघमारे, योगेश सावंत यांनीही मदत केल्याचे राहुलचे म्हणणे आहे.

Web Title: Both of them were the real heroes of the police line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस